प्रसिद्ध TV अभिनेत्याची हत्या ! विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय

पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ अभिनेता सेल्वाराथिनम (Selvarathinam) याची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. थेनेमोझी बीए या मालिकेतून हा अभिनेता प्रसिद्ध झाला होता. सध्या चेन्नई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तपासात पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. यात 4 जण घटनास्थळी संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत. याच चौघांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत.

शनिवारी (दि. 17 नोव्हेंबर) रात्री सेल्वाराथिनमची हत्या झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्या दिवशी सेल्वाराथिनम मालिकेच्या शूटिंगसाठी गैरहजर होता. त्या दिवशी त्यानं सुट्टी घेतली आणि पूर्ण दिवस मित्रमंडळींसोबत मजा मस्ती केली. जेव्हा रात्री तो घरी आला तेव्हा त्याला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यानं अभिनेत्याला घराच्या बाहेर बोलावून घेतलं. त्यावेळी त्याच्यासोबत दोन रूममेट्स होते. तो त्यांना म्हणाला की, माझा एक जुना मित्र भेटायला आला आहे. त्याला घेऊन येतो. परंतु तो बराच वेळ घरी आला नाही. जेव्हा त्याचे 2 मित्र त्याला पाहण्यासाठी घराबाहेर आले तेव्हा तो अभिनेता त्यांना घराबाहेर मृतावस्थेत सापडला. त्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला.

सेल्वाराथिनम याचे एका स्त्रीसोबत अनैतिक संबंध होते. त्या महिलेच्या पतीनं या अभिनेत्याला एकदा जिवे मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळं आता महिलेच्या पतीनंच ही हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सेल्वाराथिनम लहान पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता होता. मूळचा तो श्रीलंकन होता. काम मिळवण्यासाठी तो 2005 साली भारतात आला होता. त्यानंतर आजवर तो साऊथ एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत कार्यरत होता. म्हणजेच एक दशक. थेनेमोझी बीए या मालिकेतून तो खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला होता. यात त्यानं खलनायकाची भूमिका साकारली होती.