मुंबईतील भवन कॉलेजमध्ये नोकरीच्या अमिषाने अडीच लाखांचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील भवन कॉलेजमध्ये नोकरी लावण्याच्या अमिषाने चार जणांकडून भामट्याने २ लाख ४० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महेश कदम (वय ३०, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली असून मधुकर दादू साळवे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कदम हे मुळचे मुंबईचे आहेत. महिन्याभरापुर्वी कदमची साळवेसोबत ओळख झाली होती. त्यावेळी साळवेने कदमला मुंबईतील भवन कॉलेजमध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवले. गेल्या महिन्यात कदम पुण्यात आले. कदम आणि साळवे हे भांडारकर रस्त्यावर भेटले. त्यावेळी साळवे याने कदम यांच्यासह त्यांच्या तीन नातेवाईकांना महाविद्यालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून प्रत्येकी ६० हजार रुपये असे एकूण २ लाख ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर कदम यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. साळवेचा फोन बंद होता. त्यामुळे त्यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलीस उपनिरीक्षक बी. बी. मेटे तपास करत आहेत.