अंघोळ करताना तरुणीचा लपून शूट केला VIDEO, नंतर असं केलं ब्लॅकमेल

कुशीनगर : वृत्तसंस्था – देशात एकीकडे कोरोनाने थैमान घातले आहे. लॉकडाऊनचा काळ देखील वाढवण्यात आला आहे. अशातच काही गंभीर गुन्ह्यांची प्रकरणे समोर येत आहेत. उत्तर प्रदेशातील पाथर्वा भागातील रहिवासी असलेल्या एका तरूणाने एका किशोरवयीन मुलीचा घरात स्नान करतानाचा गुप्त व्हिडिओ शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी तो देऊ लागला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणाबाबत तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार देऊन कारवाईची मागणी केली. पोलिसांनी या तरूणाला अटक केली आणि तुरूंगात पाठविले. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर या युवकाने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे सांगितले. हे कळताच पीडित तरुणी आणि तिच्या आईने बुधवारी तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली. या प्रकरणी पाथर्वा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकांनी कारवाई केली जात असल्याचे सांगितले. लवकरच आरोपी युवकास अटक करुन तुरूंगात पाठविले जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पीडितेला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी तो तिला व्हिडिओवरून धमकावत आहेत. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून तरुणीला धीर देण्याचं काम सध्या सुरू आहे. दरम्यान, परिसरात अशा प्रकारे घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.