चोरीचा बनाव करुन १ लाख रुपये हडपणाऱ्यास अटक

जालना : पोलीसनामा ऑनलाईन

चोरट्यांनी आपल्याकडील १ लाख रुपये लुटल्याची तक्रार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी हा चोरीचा बनाव केला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मस्तगड परिसरात राहणारा विजय किसन खैरे (२१)  हा एका स्क्रॅप कंपनीत काम करतो. कंपनीचे मालक अनूप अग्रवाल यांनी त्यांचा मित्र रवि चौधरी यांच्याकडून १ लाख रुपये घेवून राजेश काळे यांच्याकडे नेऊन देण्यास  विजयला सांगितले होते.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8c7cb98d-cf69-11e8-b22b-b5c2597da6ce’]

मात्र, ही रक्कम काळे यांच्याकडे घेवून जाताना हॉटेल फ्लोरा इन जवळ त्यांला ३  चोरांनी पकडले आणि अंधारात घेवून जावून त्यांच्याकडील १ लाख रुपये हडप केले. अशी तक्रार त्याने चंदनझिरा पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणी तपास करीत असताना पोलिसांना काही ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे विजयवर  त्यांचा संशय बळावला. दरम्यान त्याची कसून चौकशी केली असता त्यानेच चोरीचा बनाव केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्याकडून लंपास केलेले १ लाख रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले.

[amazon_link asins=’B00DVSSAT6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9e4221df-cf69-11e8-b5d2-7b4927568b04′]

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : सलीम खान अनीस खान (२२) या तरुणाने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शहरातील शनिपेठेतील काट्याफाईल भागात तो राहत होता. सलीमने आत्महत्या का केली त्याचे कारण समजू शकलेले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पाकची धमकी : एकाच्या बदल्यात १० सर्जिकल स्ट्राईक करू

सलीमचे वडील अनीस खान शाहीद खान हे आरटीओ एजंट आहेत. मोठा मुलगा तलाह याच्या पत्नीला मुलगी झाल्याने तिला पाहण्यासाठी कुटुंबातील सर्वजण दवाखान्यात गेले होते. त्यामुळे लहान मुलगा सलीम हा एकटाच घरी होता. सलीमचे आजोबा शाहीद खान हे वयोवृद्ध असल्याने ते घरी होते. मात्र, ते घरातील दुसऱ्या खोलीत झोपले होते. घरात कोणी नसल्याचे पाहून सलीमने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी ५वाजता सलीमचा भाऊ शाहबाज हा घरी आला असता त्याला सलीम गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याने तत्काळ वडील व मोठा भाऊ तलाह याला घटनेची माहिती कळविली. शेजारी राहणाऱ्या डॉक्टरांना बोलावले असता त्यांनी सलीमला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सलीम हा अनेक दिवसापासून तणावात होता. त्याचे कारण कुटुंबालाही माहिती नव्हते. सलीम हा गोलाणी मार्केटमध्ये मोबाईल विक्रीच्या दुकानावर कामाला होता. मोठा भाऊ देखील मोबाईलच्याच दुकानावर कामाला आहे तर लहान भाऊ वडिलांसोबत आरटीओ कार्यालयात एजंटच्या कामांना मदत करतो.