धक्कादायक ! लग्न करु शकत नसल्याने प्रेयसीला केटामाईनचं इंजेक्शन देऊन संपवलं, नवी मुंबईतील घटना

नवी मुंबई : वृत्त संस्था – प्रेयसीला जीवघेणा आजार झाला होता त्यामुळे आपण तिच्यासोबत लग्न करु इच्छित नसल्याने प्रियकराने तिला केटामाईन इंजेक्शन देऊन संपवलं. ही धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली असून पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी प्रियकरला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आरोपीने आजारातून बरं करण्याचा बहाणा करत तिचा खून केला. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

डोळ्यांच्या समस्येपासून ‘कब्ज’मध्ये देखील फायदेशीर ठरतात हिरवे धणे, जाणून घ्या 5 चमत्कारी फायदे

रिक्षाचालकामुळे प्रकरण उघडकीस

पनवेल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी प्रस्तावित विमानतळ असणाऱ्या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. घटनास्थळी कोणतंही ओळखपत्र किंवा कागदपत्र सापडले नसल्याने मृतदेहाची ओळख पटली नव्हती. रविवारी एका रिक्षाचालकाला प्लास्टिक बॅग सापडली ज्यामध्ये आधार कार्ड, पर्स, आणि महिलेचे कपडे होते.

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

यानंतर पोलिसांनी आधार कार्डच्या माहितीवरुन महिलाचा भाऊ रमेश ठोंबरे यांला पोलीस ठाण्यात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आले. रिक्षाचालकाला मिळालेलं सामान आपल्या बहिणीचं असल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं. रमेश ठोबरे याने पनवेलमधील रुग्णालयात काम करणाऱ्या चंद्रकांत गिरकर नावाच्या युवकासोबत बहिणीचे प्रेमप्रकरण सुरु होते अशी माहिती पोलिसांना दिली. बहिणीला फोनवर त्याच्याशी भांडताना आपण ऐकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत

आरोपीकडून गुन्हा कबूल

रमेश ठोंबरे याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक आरोपीला अटक करण्यासाठी रवाना करण्यात आले. आरोपीला अटक करुन पोलिसा ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपी चंद्रकांत याने गुन्ह्याची कबुली दिली. गेल्या सहा महिन्यापासून आपले तिच्यासोबत प्रेमसंबंध होते अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. आपल्या आजारामुळे लवकरात लवकर लग्न करण्यासाठी महिला आपल्याला धमकावत होती, असा दावा आरोपीने केला आहे.

महिलेसोबत वारंवार होणाऱ्या भांडणाला वैतागून आरोपीने तिला संपवण्याचा कट रचला. आरोपीने सांगितले की, त्याने केटामाईनचं इंजेक्शन घेतलं आणि प्रेयसीला यामुळे ती बरी होईल असं खोटं सांगितलं. खून केल्यानंतर त्याने महिलेचा मोबाईल आणि बॅग फेकून देत पुरावे नष्ट केले होते. आरोपी गायकरला न्यायालयात हजर केले असता त्याला 6 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

READ ALSO THIS :

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

घटस्फोटीत महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, रोज घेत होती 4 तास ‘क्लास’

नियम सर्वांना सारखाच ! बीडमध्ये चक्क न्यायाधीशांना 200 रुपयांचा दंड, कर्तव्यावरील पोलिसाच्या प्रामाणिकतेचा परिचय