अरे बाप रे ! तीन हजार फूट उंचीवर त्याने केलं ‘प्रपोज’

ओस्लो : वृत्तसंस्था – प्रेयसीला केलेले प्रपोज संस्मरणीय ठरावे यासाठी प्रियकर काय काय शक्कल लढवतील काही सांगता येत नाही. सामान्यतः गुडघ्यावर बसून प्रेयसीला प्रियकराने प्रपोज केल्याचे आपण चित्रपटात पाहतो. परंतु या पारंपरिक प्रपोजला फाटा देत अनोख्या पद्धतीने प्रपोज करण्याचे फॅड तरुणांमध्ये वाढताना दिसून येत आहे. अशाच एका हटके प्रपोजची कहाणी समोर आली आहे. या कहाणीत एका तरुणाने तब्बल तीन हजार फूट उंचीवर प्रेयसीला प्रपोज केले आहे. एवढेच नाही तर दोन खडकांच्या मध्ये अडकलेल्या दगडावर हे प्रपोज करण्यात आले आहे.

नॉर्वेतील ३३ वर्षीय क्रिश्चियन रिचर्ड्स या व्यक्तीने जमिनीपासून तीन हजार फूट उंचीवर दोन मोठ्या खडकांच्या मधोमध जाऊन आपल्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे. खडकाच्या आजूबाजूला पाणीच पाणी आहे. तसेच दोन्ही खडक एका भल्यामोठ्या दगडाने जोडले गेले आहेत. त्या दगडावर उभे राहून रिचर्ड्सने प्रेयसीला प्रपोज केलं. हे अनोखं प्रपोजल पाहून प्रेयसी अवाक झाली नाही तरच नवल. या प्रपोजलमुळे रिचर्ड्सची प्रेयसी बेक्स मोर्ले हिचा आनंद गगनात मावत नव्हता. रिचर्डसचे हे प्रेम पाहून बेक्सने त्याच क्षणी त्याला होकार दिला आणि प्रपोजचा स्वीकार केला. बेक्स खूप भावनिक झाली होती.

ज्यावेळी रिचर्ड्सने जमिनीपासून ३००० हजार फूट उंचीवर गुडघ्यावर बसून लग्नासाठी प्रपोज केलं. त्यावेळी बेक्स आनंदाश्रू रोखू शकली नाही. त्याच क्षणी तीने आपला होकार असल्याचे त्याला मिठी मारत सांगितले. या हटके प्रपोजलचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशा धोकादायक ठिकाणी प्रपोज करणे ही सोप्पी गोष्ट नाही. आनंदाच्या भरात तोल जाऊन ३००० फूट खाली पडण्याची भीती अशा क्षणी असते. पण रिचर्ड्सला दुसरीच चिंता सतावत होती. रिचर्ड्स म्हणतो की, मला दुसऱ्याच गोष्टीची चिंता पडली होती. ऐवढ्या उंचीवर असताना रिंग हातातून खाली पडू नये याची भिती मला होती, कारण ती रिंग मी पुन्हा शोधू शकलो नसतो.

आरोग्यविषयक वृत्त –

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’