‘फॅन’ने चक्क कतरिना कैफला घातली ‘मागणी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेलिब्रिटी कोणीही असो त्यांना चाहत्यांचा आदर असतोच. हे एका कार्यक्रमावरुन कळून येते. ‘पिंच’ या कार्यक्रमात अभिनेता, निर्माता-दिग्दर्शक अशा भूमिका पार पाडणारा अरबाज खान ‘पिंच’ या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत असून तो विविध बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत मनमोकळ्यापणाने गप्पा देखील मारतो. याच कार्यक्रमात अभिनेत्री कतरिना कैफ अरबाजशी मन खुलून बोलली.

‘पिंच’ या कार्यक्रमात कतरिनाने सोशल मिडियावर चाहत्यांच्या तिच्याविषयी येणाऱ्या प्रतिक्रिया आणि आणखी काही मुद्द्यांवर मनमोकळ्यापणाने विचार मांडले. यावर एका वेगळ्या वळणावर आल्यानंतर अरबाजने तिच्या लग्नाविषयी प्रश्न केला. आणि तिच्यापुढे एका चाहत्याने दिलेल्या लग्नाचा प्रस्तावही ठेवला. सोशल मीडियाच्या माध्यमातून एका चाहत्याने कतरिनाला मागणी घातली होती.

तेव्हा चाहत्याने म्हटले की, मला तुझा दूरध्वनी क्रमांक दे आणि माझ्याशी लग्न कर. मी तुझे खरे प्रेम आहे. तुझ्याशिवाय जगु शकत नाही. यावर कतरिना म्हणाली की, आजच्या काळात कोणा एका व्यक्तीच्या इतक्या उत्कट भावना असतील हे पाहून खरंच आनंद होतो. हल्ली प्रत्येकजण या सर्व गोष्टींमध्ये समतोल राखण्याच्या प्रयत्नात असून कोणत्याच गोष्टींचा गांभीर्याने विचार करत नाही. असे बोलून तिने प्रस्ताव नाकारला. पण, त्या चाहत्याच्या भावनांप्रती तिने आनंदही व्यक्त केला. कतरिना सध्या खासगी आयुष्याविषयीच्या काही गोष्टी तिने माध्यमांपासून दूर ठेवले आहे.

Loading...
You might also like