काय सांगता ! होय, पत्नीचं इस्टाग्रामवरील ‘ते’ चॅटिंग वाचून पती गेला चक्क कोमात, पुढं झालं असं काही…

राजस्थान : पोलीसनामा ऑनलाइन – सध्याचा सोशल मीडिया (Social Media) मात्र काही दिवसात लग्नावेळी घेतलेली वचने तोडण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. घटस्फोट (Divorce) होण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलं आहे. सात फेऱ्या घेत वर-वधू दोन्ही सुखी संसाराची स्वप्न पाहतात. वाढलेल्या घटस्फोटाच्या प्रमाणात सर्वात मोठा वाटा हा विवाहानंतरचे आणि विवाहपुर्वीचे प्रेमसंबंध. लग्न होऊन फक्त ९ दिवस झाले असतील तितक्यात नवरदेवाने न्यायालयाची पायरी चढली.

राजस्थान (Rajasthan) च्या जोधपूरमध्ये एक असंच प्रकरण समोर आले आहे. एका नवविवाहित व्यक्तीने लग्नाची ९ व्या दिवशीच आपल्या पत्नीविषयी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. नववधू मुलीचा पुर्वीचा प्रियकराने तिला मोबाईलवर मेसेज पाठवला तो तिच्या नवऱ्याच्या मिळाला. त्यानंतर नवऱ्याने थेट पोलीस स्टेशन गाठलं. बायकोची इंस्टाग्राम चॅट नवऱ्याच्या हाती लागली. यानंतर नवऱ्याला माहिती झालं की, त्याच्या बायकोला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. यामुळे या संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशन गाठतं त्याच्या बायकोविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. सुमनसोबत रामेश्वरचं लग्न मागील वर्षी २५ जुलै महिन्यात झालं होतं. त्यानंतर ९ दिवसात सुमन माहेरी गेली होती. त्यानंतर रामेश्वर अमेरिकेला गेला, तेव्हा सुमन आणि त्याची वाहिनीने घराचं कुलूप तोडून घरात घुसून वस्तू नेल्या. त्यानंतर रामेश्वरवर हंडुा, घरगुती अत्याचार केल्याचा आरोप केला.

पत्नी सुमनने इंस्टाग्रामवर (Instagram) आपल्या पुर्वीच्या प्रियकराशी चॅट केली होती. त्यात लिहिलं होतं की, ‘मला त्याच्याशी लग्न नाही करायचं आणि जर लग्न झालं तरी तुला लग्न करावं लागेल. मी मम्मी आणि वाहिनीची शपथ घेऊन सांगते, जर तु मला सोडलं तर मी आत्महत्या करेल.’ नवऱ्याला जेव्हा हा मेसेज समजला तेव्हा त्याने लगेच पोलीस स्टेशन गाठलं. मिळालेल्या माहितीनुसार, सुमन आणि त्याची वहिनीविरोधात फसवणुकीसह इतर प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेलं तेव्हा तक्रारदार रामेश्वर जांगडाचे वकिलांनी सांगितलं, की त्यांचा अशील हा अमेरिकेत राहतो आणि तो नांमिकत कंपनीत काम करत असून त्याचा राष्ट्रपतींकडून सन्मानित करण्यात आला आहे.