इंदौरमध्ये पतीचा कोरोनाने मृत्यू, चीनहून पत्नीने व्हिडिओ कॉलद्वारे केले अंत्यसंस्कार

इंदौर : वृत्त संस्था – मध्य प्रदेशच्या इंदौरमधून एक वेदनादायी मृत्यूचे वृत्त समोर आले आहे. येथे एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. व्यवसायाने सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या व्यक्तीने 12 दिवसांपर्यंत कोरोनाशी झुंज दिली. परंतु इंदौरच्या हॉस्पिटलमध्ये हा लढा अखेर अशस्वी ठरला. मृत व्यक्ती चीनच्या एका बँकेत काम करत होता. त्याच्या वडीलांचा सुद्धा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ज्यानंतर तो येथे आपल्या आईची देखरेख करण्यासाठी थांबला होता.

मृत मनोज शर्मा मध्य प्रदेशच्या सिवनी- बालाघाट येथील राहणारे होते आणि चीनमध्ये ते शेन झेन बँकेत नोकरी करत होते. तीन महिन्यापूर्वी पत्नी आणि मुलांसह ते भारतात आपल्या घरी परतले होते. परंतु त्याच दरम्यान त्यांच्या वडीलांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यांना आईच्या देखभालीसाठी येथे थांबावे लागले आणि पत्नी मुलासह परत चीनला गेली.

या दरम्यान मनोज यांना सुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आणि त्यांची प्रकृती जास्त खराब झाली. त्यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चाली होती. अखेर 12 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला.

चीनमध्ये त्यांच्या पत्नीला याबाबत कळवण्यात आले. कोरोनामुळे त्यांची पत्नी भारतात येऊ शकत नव्हती. अशा अवघड स्थितीत त्यांच्या पत्नीने मृत मनोज यांच्या एका मित्राला अंत्यसंस्कारासाठी संपर्क साधला.

मृत मनोज यांच्या मित्राने इंदौरच्या एका समाजिक संस्थेशी संपर्क साधला. ते समाजसेवक यश प्रेरणा पाराशर यांच्याशी बोलले. यानंतर मित्र यशने सर्व माहिती एडीएम राजेश राठोड आणि अ‍ॅडिशनल एसपी प्रशांत चौबे यांना दिली.

मानवता धर्म पूर्ण करण्यासाठी पोलीस अधिकारी सुद्धा पुढे आले. त्यांनी ताबडतोब कोरोना प्रोटोकॉलनुसार मनोज शर्मा यांच्या अंत्य संस्काराची तयारी पूर्ण केली आणि हिंदू विधीनुसार मनोज यांच्यावर अंत्य संस्कार केले. हजारो मैल दूर चीनमध्ये हताश बसलेल्या पत्नीने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला. मनोज यांच्या पार्थिवाला समाजसेवक यश पाराशर यांनी मुखाग्नी दिला.