तोंडाच्या दुर्गंधीमुळे मीठी मारण्यास दिला नकार ; चाकूने केले सपासप वार

बेंगळुरू : वृत्तसंस्था – तोंडाची दुर्गंधी येत असल्यामुळे मित्राने मीठी मारण्यास नकार दिल्याच्या कारणावरून चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बंगळुरू शहरात घडली आहे. हा प्रकार शहरातील मावल्ली मशीद परिसरात घडला असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.

शोएब पाशा (वय-२३) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर नबी उर्फ बल्ली याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नबी हा दुचाकीवरुन जात असताना त्याला शोएब दिसला. त्याने गाडी थांबवून त्याने शोएबला हस्तादोलन करून मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तो जवळ जाताच त्याच्या तोंडाची दुर्गंधी आल्याने शोएबने त्याला मीठी मारण्यास नकार दिला.

तोंडाच्या दुर्गंधीमुळे शोएबने मीठी मारण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. चिडलेल्या नबीने शोएबवर चाकूने सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शोएबने आपल्या लहान भावाला बोलावून घेतले. संतापलेल्या नबीने त्याच्यावरही सपासप वार करून त्यालाही गंभीर जखमी केले. दोघांना तातडीने रुग्णालायात दाखल करण्यात आले. पोलिसांनी नबीवर गुन्हा दाखल करून अटक केली.

बाळासाहेब आंबेडकर यांची मुंबईत आज पत्रकार परिषद ,विधानसभेबाबत करणार मोठा खुलासा

ताण-तणाव दूर करून आनंदी जीवन जगा, ५ सोप्या पद्धती

पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी केला हात साफ

विविध रंगाच्या बाटल्यांमधील पाणी प्या, आरोग्य सुधारेल

सर्दीची ‘अ‍ॅलर्जी’ का होते ? जाणून घ्या यामागील कारणे

भरपावसात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?

रोहित पवार या मतदारसंघातून लढणार

 

You might also like