धक्कादायक ! प्रियकराचं झालं तिच्याशी ब्रेकअप, नंतर सूड उगवण्यासाठी विकू लागला प्रेयसीचे अश्लील फोटो अन् व्हिडीओ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : गर्लफ्रेण्डचे आक्षेपार्ह आणि अश्लील फोटो अपलोड केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसांनी पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये कामाला असून या व्यक्तीचा मासिक पगार एक लाखांपर्यंत आहे. असे असतानाही ही व्यक्ती 10 ते 20 रुपयांना स्वत:च्या प्रेयसीचे खासगी आणि आक्षेपार्ह विकायचा. या तरुणाला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर अली आहे. नोएडामधील एका तरुणीने 3 मे रोजी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली. मागील काही दिवसांपासून अश्लील वेबसाईटवर माझे काही फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले जात आहेत असे तरुणीने तक्रारीमध्ये म्हटले आहे.

या प्रकरणामध्ये पोलिसांनी सायबर क्राइम पोलिसांच्या मदतीने पुढील काही दिवस प्रकरणाचा सखोल तपास केला. या तपासामध्ये या तरुणीचे फोटो अश्लील वेबसाईटवर अपलोड करुन ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून पैस कमवण्याचा उद्योग सुरु असल्याचे उघड झाले. या प्रकरणामध्ये तीन जणांचा सहभाग असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी या तिन्ही व्यक्तीबद्दल माहिती गोळा केली. या तिघांबद्दलची माहिती पोलिसांनी या तरुणीबरोबर शेअर केली असता या तिघांपैकी एका व्यक्तीला तिने ओळखले.

या पैकी एक व्यक्ती माझा एक्स बॉयफ्रेण्ड असून चार वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो असा खुलासा केला. हा पश्चिम बंगालमधील बरुईपूरमध्ये राहत असल्याची माहितीही या तरुणीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी लॉकडाउन असतानाही 1 हजार 500 किमीचा प्रवास करुन कोलकत्याला जाण्याचा निर्णय घेतला. पोलीस कोलकात्याला पोहचल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने नोएडा पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले.