काँग्रेसला मतदान केल्याने चक्क भावावरच केला ‘गोळीबार’

झज्जर : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणुकीचे सहा टप्प्यातील मतदान पार पडले असून शेवटचा टप्पा येत्या १९ मे ला होत आहे. २३ मे ला जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. देशात निकालावरून आणि निवडणुकीच्या मतदानावर चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, याच चर्चा गंभीर होत हिंसक घटना घडत आहेत. अशीच एक घटना हरियाणातील झज्जर या ठिकाणी घडली आहे.

झज्जर लोकसभेसाठी सहाव्या टप्प्यात मतदान झाले. या ठिकाणी एका भाजपा समर्थकाने राजकीय प्रेमापोटी स्वत:च्या भावावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी हा भाजपा समर्थक आहे त्याच्या भावाने काँग्रेसला मतदान केल्याचा राग अनावर झाल्याने त्याने भावावरच गोळी झाडली. यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला आहे. भावाने देखील आपल्याप्रमाणे भाजपाला मतदान करावे अशी ईच्छा त्याची होती मात्र भावाने काँग्रेसला मतदान केले.

मतदानादिवशी काँग्रेस समर्थक आणि भाजपा समर्थक यांच्यात वाद झाले होते. यानंतर भाजपा समर्थक धर्मेंद्रने त्याचा भाऊ राजा याच्यावर गोळी झाडली. या दोघांमधील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या आईला देखील यामध्ये दुखापत झाली. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी राजू आणि त्याची आईला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

भाजपा समर्थक धर्मेंद्र याने राजाला भाजपाला मतदान करण्यास सांगितले. मात्र राजाने काँग्रेसला मतदान केले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाले. त्यातूनच धमेंद्रने राजावर गोळी झाडल्याचे जखमी आईने पोलिसांना सांगितले. दरम्यान दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गोळीबार करणाऱ्या धर्मेंद्रवर पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोध पोलीस घेत आहेत.

Loading...
You might also like