धक्‍कादायक ! ब्रायफ्रेन्डनं गर्लफ्रेन्डच्या घरी जाऊन घातली गोळी, स्वतःच्या कानफाडावर पिस्तुल लावून ट्रिगर दाबलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लखनऊमध्ये  एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका प्रेमाने गोळी झाडून आपल्या प्रेमिकेची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तसेच वैद्यकीय तपासणीसाठी देखील पाठवले आहेत. मृत मुलगी हि आपल्या बहिणीबरोबर भाड्याच्या घरात राहत होती. मागील तीन ते चार वर्षांपासून तिचे एका युवकाशी प्रेमप्रकरण होते. लग्न न झाल्याने प्रेमाने हे  मोठे पाऊल उचलले आहे.

बहिणीबरोबर राहत होती मुलगी

हि घटना ठठेरी बाजारमधील असून मृत मुलगी हि आपल्या बहिणीबरोबर येथे भाड्याच्या घरात राहत होती. एका खासगी दवाखान्यात ती नर्सचे काम करत होती. शुक्रवारी तिचा प्रेमी मदन लाल हा तिच्या घरी आला. त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या वादानंतर त्याने आपल्या प्रेमिकेवर गोळ्या झाडत तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडात आत्महत्या केली.

दरम्यान, पोलिसांनी  मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी आणि पोस्टमोर्टमसाठी पाठवले असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

visit : Policenama.com 

You might also like