कोरोना ‘रिलीफ’मधून करोडो घेऊन खरेदी केली महागडी कार, राहू लागला लग्झरी हॉटेलमध्ये

फ्लोरिडा : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे लाखो लोकांची नोकरी गेली आहे आणि मोठ्या संख्येने असे लोकही आहेत ज्यांना खाण्याचे सामान मिळवण्यासाठी सुद्धा अडचण येत आहे. परंतु, अमेरिकेत एका व्यक्तीने कोरोना रिलीफ प्रोग्रामअंतर्गत 29.8 कोटी रुपये मिळवले आणि नंतर अय्याशी करू लागला. शुक्रवारी या तरूणाला अटक करण्यात आली, परंतु मंगळवारी कोर्टाने त्यास जामीन दिला.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये राहणार्‍या डेव्हिड हिन्सवर बँक फ्रॉडचा आरोप करण्यात आला आहे. त्याने कोरोना रिलीफ प्रोग्रामच्या पैशातून करोडो रूपयांची लँबॉर्गिनी कार आणि अन्य लग्झरी सामान खरेदी केले आणि महागड्या हॉटेलात राहू लागला.

स्थानिक अधिकार्‍यांनी आरोप केला की, 29 वर्षांच्या तरूणाने बँकेची फसवणूक केली, चुकीची माहिती दिली जेणेकरून रिलीफ प्रोग्राममधून पैसे मिळावेत.

सुरूवातीला तरूणाने विविध कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना सॅलरी देणाच्या नावावर सरकारकडून 135 लाख डॉलर मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु तपासात समजले की, अनेक कर्मचारी बनावट होते आणि अनेकांची सॅलरी सांगण्यात आलेल्या सॅलरीपेक्षा खुप कमी होती. मात्र, बँकेने अगोदरच त्यास 39 लाख डॉलरचे लोन मजूर केले होते.

स्पोर्ट कारने एक अ‍ॅक्सीडेंट झाल्यानंतर अधिकार्‍यांनी त्याच्या चौकशीला सुरूवात केली. यानंतर समजले की, रिलीफ प्रोग्रामअंतर्गत लोन मिळताच तरूणाने 2.3 कोटी रूपयांची 2020 मॉडलची लँबॉर्गिनी कार खरेदी केली. त्याने लाखो रूपये डेटिंग वेबसाइट, ज्वेलरी, कपडे आणि महागड्या हॉटेलांमध्ये राहण्यावर खर्च केले.