हनीमूनसाठी जमवले होते 6 लाख, पतीनं तिला न सांगताच खरेदी केला गेमिंग PC

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेमिंगच्या आहारी गेलेले अनेकजण दिवसरात्र मोबाईल-लॅपटॉपमध्ये डोके खुपसून गेम खेळतात. मात्र एका व्यक्तीने चक्क त्याच्या हनीमूनसाठी जमवलेले सारे पैसे गेमिंग पीसी खरेदी करण्यासाठी खर्च केले आहेत. थोडेथोडके नव्हे तर जवळपास 6 लाख रुपये या व्यक्तीने खर्च केले आहे.

गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. जानेवारीपासून त्यांनी दर महिन्याला पैसे साठवण्यास सुरूवात केली होती. आतापर्यंत जवळपास दोघांनी 8000 डॉलर सेव्ह केले होते. याचदरम्यान तिच्या होणार्‍या नवर्‍याने गेमिंग पीसी खरेदी करण्याबाबत तिला विचारले. तेव्हा तिने त्याला मनाई केली होती. आठवड्याने तो पीसी घेऊन आला. त्याकरता लागणारे टेबल-खुर्ची देखील घेऊन आला. जेव्हा त्याला विचारलं की, एवढे पैसे कुठून आले तर त्याने घाबरत घडला प्रकार सांगितला.

तिने रेडिटवर शेअर केलेल्या या पोस्ट आतापर्यंत 9 हजार कमेंट्स आल्या आहेत. तिची ही पोस्ट रेडिटवर खूप व्हायरल झाली आहे. तिने या पोस्टमध्ये त्याच्या गेम खेळण्याबाबत तक्रार देखील केली आहे. तसंच त्याचा पीसी जाळून टाकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या मुलीला अशी भीती आहे की, तो गेमिंगपायी हातची नोकरी देखील घालवून बसेल. त्याने हनीमूनसाठी जमवलेला सर्व पैसा खर्च केला. तिच्या होणार्‍या नवर्‍याने हा सर्व पैसा पुन्हा कमावण्याचे आश्वासन त्याने तिला दिले आहे.