धक्कादायक ! मुलीसोबतचं भांडण सोडविण्यास गेल्या ‘त्या’, जावयाकडून सासूचा खून

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – एका ४५ वर्षीय व्यक्तीने कौटूंबिक वादातून सासूवरती हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये समोर आला आहे. यामध्ये सासूचा मृत्यू झाला असून, पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. घडलेल्या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

शुक्रवारी सकाळी विरार पूर्वेकडील मनवेलपाडा परिसरातील ब्रम्हा कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या मुकेश कदरेकर याचा त्याच्या पत्नीशी घरगुती कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मुकेशने आपल्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याची सासू मालिनी साळवे (वय ६५) ही भांडण सोडविण्याकरिता गेली असता तिच्या डोक्यात वार केला.

यात तिचा जागीच मृत्यू झाला तर त्याची पत्नी आणि १४ वर्षांचा मुलगा हे चाकूहल्ल्यात जखमी झाले. हत्येनंतर मुकेश पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याप्रकरणी विरार पोलिसांनी मुकेशवरती हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.