पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावे असा सल्ला सरकारी यंत्रणांपासून ते आरोग्य तज्ज्ञांनीही दिला आहे. असे असतानाही काहीजण मास्क न लावताच रस्तावर फिरताना दिसत आहेत. अशाच बेजबाबदार लोकांचा समाचार घेण्यासाठी एका व्यक्तीने चक्क गाढवाची मुलाखत घेतली आहे. ओडिशामधील आयपीएस अधिकारी असणार्या अरुण बोथरा यांनी ट्विटवरुन एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी या व्हिडिओला, ही लॉकडाउनच्या कालावधीमध्ये प्रसारमाध्यमांनी घेतलेली सर्वोत्तम मुलाखत असे म्हटले व्हिडिओमध्ये एक व्यक्ती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींप्रमाणे बूम घेऊन चक्क गाढवाची मुलाखत घेताना दिसत आहे. तो या गाढवाला, तू मास्क लावले नाहीय. मास्क न लावता तू रस्त्यावर का बसला आहेस? असे विचारताना दिसत आहे. जवळच उभ्या असणार्या आणि गाढवाची मुलाखत पाहणार्या व्यक्तीकडे जात हा व्हिडिओमधील रिपोर्टर त्यालाही मास्क न घातलेल्या गाढवाबद्दल विचारताना दिसतो.
त्याने मास्क घातले नाहीय तो काही बोलत नाहीय असे म्हणत हा रिपोर्टर त्या व्यक्तीकडे बूम नेतो तेव्हा, तो बोलणारा प्राणी नाही असे ही व्यक्ती सांगते. पण कोणता प्राणी आहे हा? त्याला काय म्हणतात? या प्रश्नाला ती मास्क न लावलेली व्यक्ती ‘गाढव’ असे उत्तर देते. त्यावर हा मुलाखत घेणार रिपोर्टर, गाढव हे लॉकडाउनमध्ये बाहेर फिरत आणि मास्क लावत नाही असे म्हणतो. मात्र या रिपोर्टरने केलेला उपहासात्मक विनोद या व्यक्तीला कळत नाही. यामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला असून नेटकर्यांनी मुलाखतकर्त्यांचे कौतुक केले आहे.