‘तुझ्या ऑफिसमध्ये येऊन…’, महिलेला धमकी देणाऱ्याविरूद्ध FIR

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) –  मी तुला नोकरी लावली आहे. त्या बदल्यात तु मला पैसे दे नाहीतर तुला बर्बाद करून टाकीन, जीवे मारून टाकीन, तु जर माझ्या सोबत राहीली नाहीस तर तुला तुझ्या ऑफिसला येवुन तुझी बदनामी करून टाकीन असे म्हणून एका 39 वर्षीय महिलेला व तीच्या पतीला वारंवार मोबाइलवर फोन करून त्रास देऊन, फोनवर मॅसेजच्या माध्यमातून धमकी, शिवीगाळ व दमदाटी करणार्‍या पुणे येथिल राजेंद्र नथु वळे याच्या विरोधात पिडीत महिलेने इंदापूर पोलीसात फिर्याद दिली आहे. इंदापूर पोलीसांनी पीडीत महिलेची फिर्याद पोलीस दप्तरी नोंद करून घेतली असुन आरोपीवर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर हकीकत अशी की फिर्यादी महिला ही ग्रामीण रूग्णालय नारायणगाव, ता. जुन्नर जि. पुणे येथे एनआरएचएम मध्ये ऑपरेशन अटेन्डड म्हणून काँट्रॅक्ट बेसिसवर काम करत असताना तेथे राजेंद्र नथु वळे (मुळ रा. शितोळे मळा, नवी सांगवी, पुणे व सध्या रा.लष्कर पाणी पुरवठा, पुलगेटजवळ, प्रयोगशाळा पुणे) याचेशी तीची ओळख झाली. त्यानंतर आरोपीचे फिर्यादी महिलेच्या घरी जाणे येणे होत होते. त्याच काळात फिर्यादी महिलेने सरळ सेवा परिक्षा देऊन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या कार्यालयामध्ये दि. २२ मार्च २०१२ रोजी रूजु झाल्या. त्यानंतर त्या सहा. निबंधक सहकारी संस्था इंदापूर येथील कार्यालयामध्ये दि.६ नोव्हेंबर २०१५ रोजी हजर झालेल्या आहेत. त्या तेथे कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहेत.

परंतु राजेंद्र वळे हा अधुन मधुन मी तुला नोकरी लावली आहे, त्या बदल्यात मला पैसे दे असे म्हणून वारंवार फिर्यादी महिलेला फोन करत होता. तर फिर्यादी व तीच्या पतीचे मोबाईल फोनवर मेसेज पाठवुन महिलेला धमकी, दमदाटी व शिवीगाळ करत होता. तसेच फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देत तुला बर्बाद करून जीवे मारून टाकीन, तुला सोडणार नाही. तसेच तु जर माझ्या सोबत राहीली नाहीस तर तुझ्या ऑफिसमध्ये येवुन तुझी बदनामी करीन. तु मला आवडतेस, माहीती अधिकारात तुझ्या कागदपत्रांची मागणी करून तुला घरी बसवीन. अशी धमकी देऊन कागदपत्रांची मागणी करत होता. तसेच फिर्यादी यांचे मोबाईलवर दि.७ नोव्हेंबर २०१९ ते ५ जानेवारी २०२० पर्यंत फिर्यादी महिलेला अश्लील मेसेज पाठवून महीलेचा विनयभंग केल्याची तक्रार फिर्यादी महीलेने इंदापूर पोलीसांत दिली आहे. त्यावरून इंदापूर पोलीसांनी गुन्ह्यांची नोंद घेतली असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/