पुण्यातील धक्कादायक घटना ! ‘त्यानं’ अश्लील फोटोंव्दारे 42 वर्षीय फॅशन डिझायनरला केलं ‘ब्लॅकमेल’, आला ‘गोत्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका ४२ वर्षीय महिलेचे अश्लील फोटो तयार करुन शरीरसंबंध ठेवले नाहीतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या एकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. चित्रपटांमध्ये काम देतो असे सांगून आरोपीने महिलेची फॅशन डिझायनरची स्क्रीन टेस्ट घेतली. यावेळी घेतलेल्या फोटोंचा आधार घेऊन आरोपीने त्याचा गैरवापर केला. यासंदर्भातले वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने नाव राहुल श्रीवास्तव असे असून तो मूळचा केरळचा रहिवाशी आहे. तक्रारदार महिलेची आणि आरोपीची ओळख व्हॉट्सअपवर एका फॅशन इंडस्ट्रीशी संबंधित असलेल्या ग्रुपमध्ये झाली. त्यानंतर आरोपीने महिलेला चित्रपटात काम देतो असे सांगून, बोलण्यासाठी आपण भेटूयात असे सांगितलं. तसेच साळुंखे विहार येथील एका हॉटेलमध्ये या महिलेची भेट समीर नावाच्या व्यक्तीशी केली. नंतर काही दिवसांनी श्रीवास्तवने या महिलेले फोन करुन तुझे काम पाहून समीर प्रभावित झाल्याचे सांगत चित्रपट करार करण्यापूर्वी एक स्क्रीन टेस्ट केली जाईल. त्यासाठी तुला मुंबईला यावं लागेल असे श्रीवास्तवने महिलेला सांगितलं.

दरम्यान, महिलेने मुंबईला येण्यास शक्य नसल्याचं स्पष्ट केलं. मग व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून या दोघात चर्चा झाली. त्यावेळेस आरोपीने या महिलेचे काही फोटो घेतले आणि नंतर त्यामध्ये एडिटींग करुन छेडछाड केली. तसेच हे फोटो या महिलेला पाठवून श्रीवास्तवने तिला “माझ्यासोबत शरीसंबंध ठेवण्यास नकार दिला तर मी हे फोटो सगळीकडे व्हायरल करण्याची धमकी दिली.” या धमकीला न घाबरता तिने त्याकडे दुर्लक्ष केले असता त्याने दोघांच्या कॉमन व्हाट्सअप ग्रुपमध्ये यातील एक फोटो शेअर केला. त्याच्या या कृत्यानंतर या महिलेने तो ग्रुप सोडला आणि त्याचा नंबर ब्लॉक केला.

परंतु, त्यानंतर सुद्धा वेगवेगळ्या क्रमांकावरुन श्रीनिवास महिलेला तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवत होता. शेवटी त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायदा आणि कलम ३५४ (विनयभंग करणे), ३५४ (अ) लैंगिक अत्याचार करणे, ३५४ (ड) (नजर ठेवणे) आणि ५०९ (अपमानास्पद वागणूक देणे) या कलमांखाली गुन्हा दाखल केला.