संतापजनक ! 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून नाल्यात फेकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  मध्य प्रदेशात, जेथे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान महिलांच्या सन्मानासाठी आणि महिला गुन्ह्यांविरूद्ध जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तेथे महिलां संदर्भात गुन्हे वाढतच आहेत. बैतूलच्या सारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोडाडोंगरी भागात क्रूरतेची मर्यादा ओलांडणारी एका घटना उघडकीस आली आहे. येथे एका 13 वर्षाच्या दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेला.

पीडित अल्पवयीन मुलगी संध्याकाळी तिच्या शेतात कामावर गेली. शेजारच्या शेत मालकाने मुलीला एकटे पाहिले, तेव्हा तिला भूरळ घालून शेतात फिरण्यासाठी घेऊन गेला आणि तेथेच तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा मुलगी आरडाओरडा करू लागली तेव्हा त्याने मारहाण केली आणि तिच्या कपाळावर दगड मारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर बेशुद्ध अवस्थेत पीडित मुलीला नाल्यात ढकलले गेले आणि तिच्यावर दगड आणि काटे टाकले गेले, जेणेकरून कोणालाही कळू नये.

दरम्यान, जेव्हा मुलगी घरी पोहोचली नाही, तेव्हा कुटुंबीय शेतात शोध घेण्यासाठी गेले. त्यांना मुलगी नाल्यात दगडाच्या खाली दबलेली दिसली. माहिती मिळताच पोलिस अधिकारी व पोलिस दल घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने पीडितेला घोडाडोंगरी रुग्णालयात पाठविले. जेव्हा परिस्थिती सुधारली नाही तेव्हा तिला बैतूलचा रेफर करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुशील वर्माविरोधात भादंवि कलम 376-3, 323, 324, 3-4 पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सारणी एसडीओपी अभय राम चौधरी यांनी सांगितले की, सीता कामत गावातील अल्पवयीन मुलीला तिच्या शेताजवळील शेजारी भुरळ घालून सोबत घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. नकार दिल्यावर मुलीच्या डोक्यावर दगडाने हल्ला करण्यात आला आणि नाल्यात फेकून दगडांनी झाकून टाकले. पीडितेला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.