धक्कादायक ! 71 बकऱ्यांच्या बदल्यात पतीनं केला पत्नीचा तिच्या बॉयफ्रेन्डशी ‘सौदा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील गोरखपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका गावातील पंचायतीमध्ये एका महिलेची किंमत हि ७१ बकऱ्या इतकी ठरवण्यात आल्याने खळबळ उडाली. महत्वाची गोष्ट म्हणजे पंचायत देखील या गोष्टीवर राजी झाली. मात्र या महिलेच्या प्रेमीच्या पित्याने आपल्या बकऱ्या परत मागितल्याने गोंधळ उडाला.

घटना अशी आहे कि, २२ जुलै रोजी या गावातील तरुण आपल्याच गावातील एका तरुणाच्या पत्नीबरोबर पळ काढला होता. त्यानंतर हि घटना पोलिसांपर्यंत गेल्यानंतर हि महिला आपल्या प्रेमीबरोबर निघून गेली. त्यानंतर या महिलेचा पती आणि प्रेमी मागील आठवड्यात बकऱ्या चारत असताना एकमेकांसोर आल्यानंतर त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यावेळी तेथे हि महिला देखील उपस्थित होती.

पंचायतीच्या समोर तिघेही समाधानी

हा वाद वाढल्यानंतर पंचायत भरवण्यात आली. त्यावेळी पंचानी महिलेच्या प्रेमीला तुला महिला हवी कि बकऱ्या असे विचारले. त्यावेळी त्याने महिलेबरोबर राहण्याची विनंती केली. त्यानंतर पंचानी निर्णय देताना प्रेमीच्या १४२ बकऱ्यांपैकी अर्ध्या बकऱ्या पतीला देण्याचे आदेश दिले. त्यावर तो तयार देखील झाला. त्यानंतर दोघेही घरी गेले. मात्र त्यानंतर प्रेमीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात या विषयी तक्रार दाखल करून आपल्या बकऱ्या पुन्हा परत मागितल्या. त्याचबरोबर तो कुणाला बरोबर ठेवतो याच्याशी माझा काहीही संबंध नसून मला माझ्या बकऱ्या परत हव्या आहेत.

महिलेचा पती म्हणती समझोता झाला होता

त्यावर बोलताना महिलेच्या पतीने हे सर्व आरोप फेटाळून लावत म्हटले कि, आमच्यामध्ये करार झाला असून मी कोणतीही चोरी केलेली नसून त्याने माझ्या पत्नीसॊबत राहण्याच्या बदल्यात मला ह्या बकऱ्या दिलेल्या आहेत. पोलिसांनी या घटनेत लक्ष घातले असून लवकरच सामोपचाराने यावर मार्ग काढणार असल्याचे पोलीस निरीक्षकांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like