धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून मैत्रिणीलाच जाळण्याचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – चारित्र्यावर संशय घेऊन मित्रानेच मैत्रिणीच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल टाकून आग लावली. परंतु, परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. तपोवन रोडवरील ढवण वस्ती जवळील या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. ती महिला विधवा असून, तिचे पती लष्करात नोकरीला होते.

याप्रकरणी अप्पासाहेब नारायण भागवत (रा. नगर) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, ढवण वस्ती येथील एका महिलेचा पती मयत झालेला आहे. ते लष्करात नेमणुकीस होते. तिच्या ओळखीच्या एका माणसाची घरी ये जा सुरू होती. तो काही दिवसांपासून सदर महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच काल रात्री उशिरा तो या महिलेच्या घरी आला. त्या महिलेने दार उघडले नाही. त्याने संतापाच्या भरात दारावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. मात्र आजूबाजूच्या लोकांनी त्वरित धाव घेत आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

या महिलेने तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे या करीत आहेत. महिलेला दोन मुले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

‘हे’ आहेत गुणकारी कोहळ्याचे फायदे, जाणून घ्या

पावसाळ्यात केसांसाठी ‘हे’ घरगुती ‘मास्क’ !

किडनीला ‘डिटॉक्स’ करण्यासाठी प्या ‘हे’ ३ घरगुती ड्रिंक्स

गर्भावस्थेत प्रवास करताना ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या

तुळशीची पाने उकळत्या दुधामध्ये घालून त्याचा सेवन करणे ‘लाभदायक’

Loading...
You might also like