‘थलायवा’ रजनीकांतच्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली ! आज रात्री ‘या’ वेळेत प्रीमियर होणार ‘Man Vs Wild’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – डिस्कवरीवरील लोकप्रिय शो मॅन व्हर्सेस वाईल्डची लोकांना खूप दिवसांपासून प्रतिक्षा होती. चाहत्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर आता या शोमध्ये साऊथ सुपरस्टार रजनीकांत दिसणार आहेत. शोचा होस्ट आणि प्रेझेंटर बियर ग्रिल्स यानं ट्विट करत प्रीमियरची माहिती प्रेक्षकांसोबत शेअर केली आहे.

कधी आणि कोणत्या चॅनलवर होणार शोचा प्रीमियर ?
बियर ग्रिल्सनं ट्विट केलं की, “भारतात रजनीकांत सोबत Into the wild brear grylls शो खूप मजेदार होता. त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांची प्रतिक्षा संपणार आहे. लवकरच ही अ‍ॅक्शन सुरू होणार आहे. या शोचा प्रीमियर आज रात्री 8 वाजता होणार आहे. म्हणजेच तुमच्या लक्षात आलच असेल की, 23 मार्च 2020 रोजी तुम्ही हा शो पाहू शकता. हा शो डिस्कवरीवर ऑनएअर होणार आहे.”

गेल्या 2 महिन्यांपासून या शोमध्ये रजनीकांत यांच्या येण्याबद्दल चर्चा सुरू आहे. पीएम मोदी या शोमध्ये दिसल्यानंतर आता त्यांच्यानंतर या शोमध्ये दिसणारे रजनीकांत हे दुसरे भारतीय आहेत. याशिवाय या शोमध्ये अक्षय कुमारच्या येण्याचीही माहिती आहे. कारण अक्षय आणि बियरचे काही फोटो यापूर्वी व्हायरल झाले होते.