‘थलैवा’ आता Man Vs Wild मध्ये ! बेयर ग्रिल्सनं शेअर केला रजनीकांतच्या ‘शो’चा टीजर (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – साऊथ सुपरस्टार रजनीकांत लवकरच मॅन व्हर्सेस वाईल्डचा होस्ट बेयर ग्रिल्ससोबत अ‍ॅडवेंचर करताना दिसणार आहे. बेयर ग्रिल्सनं आता या शोचा टीजर रिलीज केला आहे. बेयरनं टीजर शेअर करताना लिहलं की, “रजनीकांत यांच्या ब्लॉकबस्टर टीव्ही डेब्यूची तयारी. मी जगभरातील अनेक स्टार्स सोबत काम केलं आहे. परंतु रजनीकांत माझ्यासाठी खास आहेत. लव इंडिया.”

बेयर ग्रिल्सनं रजनीकांत यांच्यासोबत कर्नाटकच्या बांदीपूर नॅशनल पार्कमध्ये शुट केलं आहे. रजनीकांत आणि बेयर जंगलात अ‍ॅडवेंचर करताना दिसणार आहेत. याआधीही बेयरनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत शूट केलं होतं. या शोला मोठी पसंती मिळाली होती. हा शो जगातील 180 देशांमध्ये प्रसारीत करण्यात आला होता.

जेव्हा बेयर आणि रजनीकांत यांच्या शुटींगची माहिती समोर आली होती तेव्हाच #रजनीकांत ट्रेंड करताना दिसला होता. याच्यावरूनच अंदाज येतो की, रजनीकांतचे चाहते रजनीकांत यांच्या या शोची किती आतुरतेनं वाट पहात आहेत. रजनीकांतनंतर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही बेयर ग्रिल्ससोबत शुटींग करण्यासाठी आला होता.

पीएम मोदी जेव्हा मॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये आले होते तेव्हा त्यातील काही भाग खूप गाजताना दिसले. ज्यात बेयरनं जेव्हा पीएम मोदींना वाघाच्या संभाव्य हल्ल्यापासून वाचण्यासाठी भाल्यासारखं एक हत्यार दिलं तेव्हा मोदी म्हणाले, “माझं पालन पोषण मला कोणाचं जीवन हिरावून घेण्याची परवानगी देत नाही. तरीही तुम्ही आग्रह करत असाल तर मी हा भाला घेतो.”