Man Vs Wild : गरीबीतल्या लहानपणापासुन 18 वर्षातील पहिल्या सुट्टीपर्यंतच्या PM मोदींनी सांगितल्या ‘या’ 8 महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिस्कवरी वाहिनीवरील शो मॅन वर्सेस वाइल्डमध्ये या शोमध्ये खास पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. बियर ग्रिल्सचा हा लोकप्रिय कार्यक्रम जगभरातील लोक मोठ्या प्रमाणात पाहत असतात. याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारी महिन्यात हजेरी लावली होती. उत्तराखंडमधील जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात या भागाचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यानंतर काल हा भाग या वाहिनीवर प्रकशित करण्यात आला. यामध्ये मोदींनी आपल्या लहानपणाविषयी ते आतापर्यंतच्या प्रवासावर भाष्य करताना पर्यावरणाचा संदेश देखील दिला.

खालील मुद्द्यांवर मोदींनी या भागात केले भाष्य
१)
या भागाच्या सुरुवातीला मोदी आणि बियर ग्रिल्स यांच्यात पर्यावरणाविषयी आणि निसर्गाविषयी चर्चा झाली. त्यावेळी मोदींनी भाष्य करताना म्हटले कि,आपण ज्यावेळी निसर्गाचा ह्रास करतो, त्यावेळी ते आपल्यासह सर्वांसाठीच घटक असते. त्यामुळे आपण नेहमी पर्यावरणाचा समतोल राखून काम करायला हवे.

२) बियर ग्रिल्स याने मोदींना त्यांच्या लहानपणाविषयी विचारले असता, मोदी म्हणाले कि, माझे बालपण अत्यंत गरिबीत गेले. अंघोळीसाठी तसेच कपडे धुण्यासाठी देखील साबण मिळत नसे. त्यावेळी पानांवर जमा झालेल्या मिठाचा वापर आम्ही आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी करत असे, असे मोदींनी सांगितले.

३) मोदींच्या कपड्यांविषयी बियर ग्रिल्स याने विचारले असता, मोदी म्हणाले कि, मी लहानपणी तांब्याच्या भांड्यात कोळसा टाकून कापडयांना इस्त्री करत असे.

४) त्याचबरोबर त्यांच्या कष्टाविषयी विचारले असता ते म्हणाले कि,त्यांनी लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकलेला आहे. वडिलांना देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.

५) बियर ग्रिल्स याने सुरक्षेसाठी एक हत्यार बनवेल असता मोदींनी यावर भाष्य करताना म्हटलं कि, कोणाला मारणं माझ्या संस्कारात नाही. पण सुरक्षेसाठी ते मी माझ्याजवळ ठेवतो.

६) मागील १८ वर्षांत मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाच्या रूपाने मी सुट्टी घेतली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. १३ वर्ष मुख्यमंत्री असताना देखील मी कधीही सुट्टी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.

७) त्याचबरोबर लहानपणीच्या पावसाची आठवण सांगताना त्यांनी सांगितले कि, लहानपणी पाऊस पडत असताना वडील २५ ते ३० पोस्टकार्ड आणून सर्व नातेवाईकांना याविषयी माहिती देत असत. त्याचबरोबर आमच्या घरी पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले. यामुळेच आमच्या आज्जीने आमच्या काकांना लाकडाचा व्यवसाय देखील करू दिली नसल्याची आठवण देखील त्यांनी सांगितले.

८) पर्यावरणाचा संदेश देताना त्यांनी म्हटले कि, आपण आपल्या पुढील ५० वर्षाच्या पिढीचा विचार करून पर्यावरणाकडे आपण लक्ष द्यायला हवे असेदेखील त्यांनी म्हटले.

आरोग्यविषयक वृत्त