खळबळजनक ! पतीनं पत्नीला मागितलं फ्रेन्च KISS, ‘तिची’ जीभ कापून झाला पसार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पतिपत्नींमध्ये भांडणे झाल्यानंतर सहजा लवकर मिटत नाहीत, मात्र गुजरातमधील एका व्यक्तीने भांडण मिटवण्याचा नावाखाली चक्क आपल्या पत्नीची जीभ कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पतीने पत्नीकडे फ्रेंच किसची मागणी केली. त्यानंतर तिने आपली जीभ बाहेर काढली असता त्याने तिची जीभ कापत पळ काढला. त्यानंतर आता पोलीस या पतीचा शोध घेत आहेत.

खूप भांडायचं नवरा
गुजरातमधील जुहापुरा येथे हि घटना घडली असून या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 2008 मध्ये पीडित महिलेचे अयूबशी लग्न झाले होते. तसलिन असे या महिलेचे नाव असून तिचे हे तिसरे तर अयुबचे हे दुसरे लग्न होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते मात्र लग्नांनंतर तो छोट्या छोट्या गोष्टींवरून तिच्याबरोबर भांडत असे. अयुब हा नोकरी करत नसे त्यामुळे घरी थांबून तो तिला मोठ्या प्रमाणात त्रास देत असे. मात्र आपला विवाह तुटू नये म्हणून ती हे सर्व सहन करत असे.

दरवाजा बंद करून फरार
दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्याने पत्नीकडे फेंच किसची मागणी केली असता पत्नीने जीभ पुढे केली. याचदरम्यान त्याने चाकूने तिची जीभ कापत तिला खोलीत बंद करून पळ काढला. त्यानंतर तिने आपल्या बहिणीकडे मदत मागितली. तसेच आसपासच्या नागरिकांच्या मदतीने तिला उपचारासाठी दवाखान्यात भरती करण्यात आले असून तिच्यावर शास्त्क्रिया केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

visit : Policenama.com