१३ किलो गांजासह एकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गाजां विक्रीसाठी आलेल्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथक आणि विमानतळ पोलिसांच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख ६० हजार रुपये किंमतीचा १३ किलो १२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
अश्विन आनंदराव वरघट (४८, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक व विमानतळ पोलिसांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती पुणे नगर रस्त्यावर फॉरेस्ट पार्क जवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी तेथे सापळा रचून अश्विन वरघट याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे १३ किलो १२० ग्रॅम गांजा मिळून आला. त्यानंतर त्याला अटक करून पोलिसांनी त्याच्याविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात एनडीपीएस अक्टनुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

You might also like