शरद पवारांना ‘थप्पड’ मारणारा 8 वर्षांनी ‘जाळ्यात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर 2011 मध्ये एका माथेफिरुने गर्दीतून पुढे येत हल्ला केला होता. याच माथेफिरुला तब्बल 8 वर्षांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री असताना दिल्लीत एनडीएमसी सेंटरमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, ते बाहेर आल्यावर अरविंदर या माथेफिरुने अचानक शरद पवारांवर हल्ला केला. अरविंंदर सिंग याला 8 वर्षांनी दिल्ली पोलिसांनी अटक केली.

शरद पवारांवर हल्ला केल्यानतंर अरविंदर हा फरार झाला होता. 2014 साली दिल्ली न्यायालयाने अरविंदरला गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. दिल्लीत ट्रान्सपोर्टरचे काम करणाऱ्या अरविंदर सिंग याने सांगितले की आपण महागाई आणि भ्रष्टाचाराने वैतागलो होतो त्यामुळे नियोजन करुन कृषिमंत्री शरद पवारांवर हल्ला केला. यावेळी या माथेफिरुने त्याच्याकडचे धारदार शस्त्र उपसलं होतं परंतू योग्यवेळी सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवल्याने तो दूर ढकलला गेला.

त्यावेळी शरद पवारांनी सांगितले की या प्रकरणाला इतके महत्व देण्याची गरज नाही. तसेच पहिल्यांदा वाटले की पत्रकारांमध्ये थक्काबुकी होत असल्याचे वाटल होतं परंतू आपण ठीक असल्याचे देखील शरद पवार म्हणाले होते.

त्यावेळी भाजप नेत्यांनी सांगितले की हा पटकन प्रसिद्धी मिळण्याचा हा मार्ग आहे आणि आपण त्या निषेध करतो. तसेच या गोष्टीला जास्त महत्व देऊ नका असेही त्यांनी सांगितले होते.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like