स्त्रियांना शरीरसुख देण्यासाठी ‘जिगोलो’ बनण्यास तयार होता तरूण, ‘या’ पध्दतीनं सापडला जाळ्यात

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –जिगोलोचं (Jigolo) काम देतो असं सांगून खोट्या वेबसाईटद्वारे तरुणांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी सावज जाळ्यात आलं की, त्यांना ऑनलाईन पेमेंट करायला लावत असे. खोट्या वेबासाईटच्या माध्यमातून या आरोपीनं तब्बल 23 लाख रुपये कमावले आहे.

आरोपी हा मूळचा बिहारच्या खागरियाचा आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. तो उत्तम नगरचा रहिवाशी असल्याचं समजत आहे. देहविक्री करणं किंवा पैशांच्या बदल्यात स्त्रियांना शरीरसुख देण्याचं काम करणारा पुरुष म्हणजे जिगोलो होय.

उत्तम नगरमध्येच राहणाऱ्या एका तरुणानं पोलिसात तक्रार केली आणि हा सर्व घोटाळा समोर आला. जिगोलो क्लबमध्ये दाखल होण्याच्या नावाखाली आपली 11 हजार रुपयांना फसवणूक केली असल्याचा आरोप त्यानं केला आहे. ज्या वेबसाईटनं जिगोलो बनण्याची ऑफर दिली त्याची सर्व माहिती या तरुणानं पोलिसांना दिली. तिथं पुरुषांना जिगोलो बनण्यासाठी निमंत्रण दिलं जायचं. एका इंग्रजी वृत्तपत्रानंही याबाबत वृत्त दिलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार तरुणानं वेबसाईटवर दाखवलेल्या नंबरवर फोन केला. यानंतर त्याला ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर जनकपुरीमध्ये भरती करणाऱ्या टीमला भेटायला जा असा मेसेज दिला. रक्कम अदा केल्यानंतर त्यानं पुन्हा फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता फोन लागतच नव्हता. जनकपुरी पोलीस ठाण्याच्या सायबर टीमनं फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे अशी माहिती डीसीपी दीपक पुरोहित यांनी दिली.

You might also like