भरसभेत हार्दिक पटेलच्या श्रीमुखात भडकवणारा व्यक्ती ‘राजकराणी’ नव्हे ‘कॉमन मॅन’

सुरेंद्रनगर : वृत्तसंस्था – कॉंग्रेस नेता हार्दिक पटेल यांच्या प्रचार सभेत स्टेजवर येऊन श्रीमुखात भडकवणारा व्यक्ती हा कुठल्याही पक्षाशी संबंधित नाही. तर तो एक सामान्य नागरिक आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे. अशी माहिती सुरेंद्र नगरचे पोलीस अधिक्षक महेंद्र बघेडिया यांनी दिली.

गुजरातमधील सुरेंद्रनगर येथे कॉंग्रेसरची प्रचारसभा आज आयोजित करण्यात आली होती. हार्दिक पटेल सध्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचा प्रचार करत आहेत. गुजरातमधील सुरेंद्रनगर मध्ये हार्दिक पटेल यांची बदलाना गावात प्रचारसभा सुरु होती. त्यादरम्यान त्यांचे भाषण सुरु असताना तरुण गुज्जर स्टेजवर आला आणि त्यांना शिवीगाळ करत चक्क त्यांच्या कानाखाली एक चापट मारली. त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला. लोकही स्टेजवर चढली होती. पोलिसांनी तरुण गुज्जर याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु आहे.

मारहाण करणारी व्यक्ती ही भाजपने पाठवली असल्याचा आरोप केला आहे. भाजपकडून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप करत त्यांनी या सर्व प्रकारामागे भाजप असल्याचा आरोप केला आहे.परंतु तरुण गुज्जर हा कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून तो एक सामान्य माणूस आहे. दरम्यान त्याने हे कृत्य हार्दिक पटेल याच्या आंदोलन काळात त्रास झाल्याने केले असल्याचे माध्यमांना सांगितले.