लॉकडाऊनमध्ये नशीब फळफळलं ! घरबसल्या एका मिनिटातच जिंकले 15 कोटी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – आयुष्यात जर नशिबाने साथ दिली तर उच्च शिखरे गाठण्यास वेळ लागत नाही. एकीकडे जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरु असतानाच अमेरिकेत एकाला लॉटरीच्या तिकिटाने घरबसल्या कोट्यावधी बनवले आहे. त्याने 2 मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 15 कोटींच्या लॉटरीचे तिकिट विकत घेतले होते. आश्चर्याची बाब म्हणजे या पठ्ठ्याने दोन्ही लॉटरी जिंकल्या आणि तब्बल 15 कोटींचा मालक झाला. त्याचे नाव जोई आहे.

कोलोरॅडोमध्ये राहणारा हा नागरिक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. यासाठी कारण एकीकडे घरात बसून काहींच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यामुळे खाण्यासाठी पैसे नाही आहे. अशा परिस्थितीत हा पठ्ठ्या चक्क 15 कोटींचा मालक झाला आहे. मुख्य म्हणजे गेली 30 वर्ष हा इसम फक्त लॉटरी विकत घेण्याचे आणि आपले नशीब आजमवण्याचे काम करत आहे. जोई यांना लागलेल्या या लॉटरी कंपनीचे मॅनेजर मेघन डोगर्टी यांनी 2 लॉटरीचे तिकिट घेतल्याचे सांगितले. त्यासाठी जोई दीड किमी अंतर चालत गेला होता. पहिले तिकिट त्यांनी सकाळी घेतले तर दुसरे संध्याकाळी घेतले होते. त्यानंतर काही वेळाने त्यांना लॉटरी कंपनीतून 15 कोटीं जिंकल्याचा फोन आला. दरम्यान लॉकडाऊनमुळे जोई यांना पैसे ऑनलाईन दिले जाणार आहे. पण जोई यांच्या संयमाला मानले पाहिले गेली 30 वर्ष ते लॉटरीचे तिकिट विकत घेते, मात्रा, त्यांना यश आले नाही. आता लॉकडाऊनमध्ये त्यांना 15 कोटींची लॉटरी लागली.