फुटपाथवरील अनधिकृत व्यवसाय बंदोबस्त करा-ममता गायकवाड

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा ऑनलाइन
महापालिकेच्या हद्दीतील फुटपाथवरील व्यवसायिकांकडून अतिक्रमण विभाग पावत्या फाडून परवानगी देत असल्याचे निदर्शनास आले असता स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांनी अशा अनधिकृत व्यवसायिकांचा त्वरीत बंदोबस्त करा.असे आदेश प्रशासनाला दिले. या विषयासह दोन कोटी ४८ लाख रुपयांच्या विषयाला मंजुरी दिली.

स्थायी समितीच्या सभेत नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी फुटपाथवर पावत्या फाडून व्यवसाय करायला परवानगी महापालिकेकडून दिली जाते का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, फुटपाथवर व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नका. महापालिकेच्या हद्दीतील मोकळ्या जागेत परवानगी द्या. फुटपाथवर अनधिकृत व्यवसाय होणार नाही याची दक्षता घ्या. असे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत गोळा केलेला कचरा उचलला जात नाही. ज्या ट्रकमधून कचरा उचला जातो त्या ट्रकमध्ये माती दगड पहिलेच असतात. त्यामुळे ट्रकमध्ये कचरा जास्त भरला जात नाही. असा ही आरोप नगरसेविकेने केला.

जलपर्णी संदर्भात नगरसेवक सागर आंगोळकर यांनी प्रशासनाला छेडले असता हा विषय नागरिकांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यामुळे पर्यावरण,आरोग्य, ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र पाहणी करून त्यावर त्वरीत उपाययोजना करा असे आदेश सभापती ममता गायकवाड यांनी दिले.

या सभेच्या चर्चेत नगरसेवक विलास मडेगिरी, सागर आंगोळकर, राजू मिसाळ, राजेंद्र गावडे,प्रज्ञा खानविलकर, करुणा चिंचवडे,अर्चना बारणे, सारीका लांडगे,साधणा मळेकर आदींनी सहभाग घेतला.