शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाण

शाळेच्या सुरक्षा रक्षकाला मॅनेजरची मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज परिसरातील भिलारेवाडी येथील एका शाळेच्या सुरक्षा रक्षकाला शाळेच्याच मॅनेजर आणि सुपरवायझरनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजीव कटके (वय 30, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आदित्य अविनाश पाटील (वय 24, रा. मामिकमोती इमारत) व निखील भोसले (वय 29, रा. नऱ्हे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शाळेत सुरक्षा रक्षक असून, ते शाळेच्या गेट क्रमांक 1 वर कर्तव्यास असतात. तर, पाटील हा मॅनेजर असून, भोसले हा सुपरवायझर आहे. दरम्यान, दोघांनी फिर्यादींना तीन दिवसांचे पंचीग का केले, यावरून जाब विचारला. त्यातून त्यांच्यात वाद झाले. वादाचे रुपांतर कडाक्याच्या भांडणात झाले. त्यावेळी दोघांनी फिर्यादींना मारहाण केली. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

कोंढव्यात सव्वा दोन लाखांची घरफोडी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, चतु:श्रृंगीत एकाच सोसायटीत चार फ्लॅट फोडल्याचा प्रकार काल उघडकीस आल्यानंतर आता कोंढव्यातही चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून सव्वा दोन लाखांवर डल्ला मारला आहे. दोन तासांसाठी घर बंदकरून गेल्यानंतर चोरट्यांनी ही कामागिरी केली आहे.

याप्रकरणी शोएब शेख (वय 30, रा. कोंढवा खुंर्द) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे येथील भाग्योदयनगरमधील पिताश्री आश्रमाच्या जवळ राहण्यास आहेत.

दरम्यान, त्यांना रात्री कामानिमित्त बाहेर जायचे होते. त्यामुळे रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. त्यादरम्यान, चोरट्यांनी कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एकूण 2 लाख 13 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. परत आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

ग्राहक केंद्रातून बोलत असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी फसविले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असल्याचे सांगत एका महिलेच्या खात्यावरून 78 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. तसेच, मी ग्राहक सेवा केंद्रातून बोलत असून, तुम्ही फॅशन मार्ट या साईटवरून खरेदी केलेली रक्कम परत करण्यात येणार असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेऊन त्यांच्या खात्यावरून ऑनलाईनच्या माध्यमातून 78 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

भंगारवाल्यांनी घरात शिरून ज्येष्ठ महिलेचे सोने चोरले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – खडक परिसरातील एका ज्येष्ठ महिलेच्या घरी भंगार खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन चोरट्यांनी घरात शिरून 93 हजार रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोघा ज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या खडक येथे राहतात. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोघे त्यांच्या घरी आले. तसेच, त्यांना भंगार खरेदी करायचे असून, तुमच्याकडे काही असेल तर देण्यास सांगितले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना देण्यासाठी तवा आणण्यासाठी आत गेल्या. यावेळी चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून घरात प्रवेश केला. तसेच, बेडरूममधील 93 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. काही वेळाने त्यांना हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी पोलीसांकडे तक्रार दिली. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.

एन.डी.ए ऑफिसर बंगल्यातून चंदनाची झाडे चोरीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील चंदन चोरट्यांचा दबदबा कायम असून, एनडीए रोडवरील ऑफिसर बंगला तसेच, शेजारील बंगल्याच्या आवारातून आणि मॅगझीन परिसरातून तब्बल 7 चंदनाची झाडे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लष्करांच्या अधिकार्‍यांचे निवस्थानच सुरक्षित नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर अन लष्कराच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याप्रकरणी निखील मेश्राम (वय 29, रा. एनडीए, खडकवासला) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुासर, अज्ञात चोरट्यांविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करात नोकरीस आहेत. त्यांची नेमणूक येथील ऑफिसर बंगल्यावर आहे.

दरम्यान, बंगल्याच्या आवारात काही चंदनाची झाडे आहेत. तसेच, त्यांच्या शेजारी असणार्‍या खासगी बंगल्यात तसेच मॅगझीन परिसरातही काही चंदनाची झाडे होती. त्यावेळी चोरट्यांनी 26 ते 27 च्या मध्यरात्री आवारात प्रवेशकरून त्यामधील एकाचवेळी तब्बल 7 चंदनाच्या झांडाचे बुंधे कापून नेले. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. त्यानंतर लष्कराकडून पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. लष्कराच्याच आवारातून झाडे चोरून नेल्याने आश्चर्य व्यक्त होत असून, सुरक्षा राम भरोसे आहे का असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. अधिक तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.

फिनीक्स मॉलमधून 2 लाखांची घड्याळे चोरीला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विमानतळ परिसरातील फिनीक्स मॉलच्या तळ मजल्यावरून चोरट्यांनी महिला व पुरूषांचे तब्बल 2 लाख 9 हजार रुपयांचे 22 घड्याळ चोरून नेले आहेत. शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी श्रीपाद (वय 35,) यांनी विमानतळ पोलीस ठण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिनीक्स मॉलच्या तळमजल्यावर युनिट नं. जीए.9 येथे किवॉस (मोकळ्या जागेत बनविलेल काऊंटर) येथील लॉक कोडून आतमधील 4 पुरूषांचे आणि महिलांचे 18 असे घड्याळे चोरून नेली आहेत. अधिक तपास विमानतळ पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/