महिला खातेदार आणि बँक मॅनेजरचं ‘जुळलं’ अन् सगळचं झालं, लग्नाला नकार दिल्यानंतर तिनं केलं ‘असं’ काही

मथुरा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मथुरा येथे एका तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमामध्ये धोका मिळाल्याने या तरूणी हे पाऊल उचलल्याची माहीत समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोसीकला पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हे प्रकरण घडले आहे. तरुणीचे सिंडिकेट बँकेत खात होतं. बँकेतील खात्याचं काम करण्यासाठी तरुणी बँकेत जात होती. मात्र, तरुणीच बँकेत जाण वरचेवर वाढू लागलं होतं. सिंडिकेट बँकेचा शाखा प्रमुख अजय यादवसोबत तिची मैत्री झाली. याच दरम्यान दोघांमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या आणि मैत्रिचं रुपांतर प्रेमात झाले. अजय यादव याने लग्नाचं खोटं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.

आरोपी अजय याचे लग्न झाले होते तरीही त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं असा आरोप पीडितेच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याने तरुणीला फसवलं आमि लग्नाच आमिष दाखवून तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, तरुणीने अजय याच्याकडे लग्नासाठी तगादा लावला होता. जेव्हा तरुणाला अजय यादव याचे लग्न झाल्याचे समजले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अजने आपल्याला पद्धतशीरपणे फसवल्याचे लक्षात येताच तिने त्याच्याकडे जाब विचारला. यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादानंतर तिने टोकाचे पाऊल उचलत विष घेऊन आत्महत्या केली.

visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like