युको बँकेच्या महिला मॅनेजरचा अपघातात मृत्यू, सहकारी गंभीर जखमी

भागलपुर : वृत्तसंस्था – बिहारमधील भागलपुरमध्ये एका अपघातामध्ये युको बँकेच्या महिला मॅनेजरचा मृत्यू झाला तर त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. किरण कुमारी असे मृत्यू झालेल्या बँक महिला मॅनेजरचे नाव आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत किरण कुमारी या पटना येथील रहिवाशी होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात नाथनगर येथील दोगच्छी येथील बायपास रोडवर मंगळवारी (दि.7) सकाळी झाला. किरण कुमारी आणि त्यांचा सहकारी स्कुटरवरून जात असताना त्यांच्या गाडीला एका ट्रॅक्टरने धडक दिली. अपघातात किरण कुमारी यांच्या डोक्याला आतून गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर स्कुटर चालवणारी त्यांचा सहकारी संजू कुमार ही गंभीर जखमी झाला. अपघातानंतर संजू कुमार आणि किरण कुमारी यांना मायागंज रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी किरण कुमारी यांना मृत घोषीत करण्यात आले.

मृत किरण यांची सहकारी आणि मैत्रिण निभा कुमारीने सांगितले की, किरण पाटणा जिल्ह्यातील दानापुर सगुना येथे राहणारी आहे. जुलै 2019 मध्ये तिची बदली बक्सर येथून भागलपुर येथे झाली होती. किरण कुमारी यांच्या अपघाताची माहिती मिळताच युको बँकेचे झोनल मॅनेजर सुभाष चंद्र आणि बाँकेतील इतर सहकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. किरण कुमारी यांच्या अपघाताची माहिती पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना दिली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/