Manasi Naik Divorce | अखेर घटस्फोटाच्या चर्चांवर मानसीने सोडले मौन; म्हणाली – ‘हो मी घटस्फोट घेतेय’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Manasi Naik Divorce | गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक चर्चेत होती. रिक्षावाला फेम म्हणून तिची ओळख तिने निर्माण केली होती. मानसी नाईकने गेल्याच वर्षी लग्न केले मात्र अवघ्या दीड वर्षातच दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे मानसीच्या पोस्टवरून सर्वांच्याच लक्षात येत होते. एवढेच नाही तर मानसीने इंस्टाग्राम वरून दोघांचे फोटोजही डिलीट केले होते. तर मानसी भावुक पोस्ट आजकाल शेअर करत होती. आता मानसीने या सगळ्या गोष्टींवर पूर्णविराम देत घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडला आणि हो मी घटस्फोट घेतीये याचा खुलासाही तिने एका मुलाखती दरम्यान दिला आहे. (Manasi Naik Divorce)

 

मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांचे नेहमीच फोटो रील्स सोशल मीडियावर सातत्याने वायरल होत असतात आणि ते चाहत्यांना देखील पसंतीस पडत असतात. मात्र आता मानसी प्रदीप पासून वेगळी होणार या गोष्टीचा पुरावा तिने दिला आहे. घटस्फोटच्या चर्चांवर बोलताना मानसी म्हणाली, “हो मी घटस्फोट घेणार आहे. मी खोटं नाही बोलणार मी घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. प्रक्रिया सुरू झाली आहे या सगळ्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं माझ्यासाठी अद्याप तर कठीण आहे”. (Manasi Naik Divorce)

पुढे बोलताना मानसी म्हणाली, “या सगळ्या गोष्टी खूप घाईत होत आहेत. एक वेळा अशी होती जेव्हा मला माझ्या कुटुंबाची गरज होती आणि मी तेव्हा लग्न केले. मला वाटतं तिथेच माझं काहीतरी चुकलंय आणि आता मी या लग्नाच्या नात्यातून बाहेर पडतीय मात्र एक गोष्ट आहे की मला माझा स्वाभिमान आहे. माझी स्वतःची काही मतं आहेत. आता मी माझा करियर घडवण्याकडे लक्ष देणार आहे. ही वेळ माझ्या करिअरवर लक्ष देण्याची आहे. कधीकधी आपला आपल्या माणसांवरून विश्वास उडतो. माझ्याबाबतीत ही तेच झाले मला भावनिक दृष्ट्या आधाराची गरज होती पण माझ्याबरोबर या नात्यात असे काही घडले नाही. यामुळे मी आता या नात्यातून बाहेर पडत आहे”. यावेळी मानसीने एक सल्ला देखील दिला आहे ती बोलताना म्हणाली, “जर नात्यात समजूतदारपणा नसेल तर ही तुमच्यासाठी धोक्याची सूचना आहे. अशा नात्यातून बाहेर पडा आणि पुढे जा”.

 

Web Title :- Manasi Naik Divorce | manasi naik revealed filed for divorce from husband pardeep kharera

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत