Manasi Naik on Ketki Chitale | मानसी नाईक केतकी चितळेवर संतापली; म्हणाली – ‘मराठी कलाकाराने अशा पोस्ट करणं लज्जास्पद’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Manasi Naik on Ketki Chitale | राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट टाकून मराठी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketki Chitale) चांगलेच महागात पडले आहे. काल केतकीला अशा वक्तव्यानंतर अटक करण्यात आली. याप्रकरणी केतकीला 18 मे पर्यंत पोलिस कोठडी (Police Cell) सुनावण्यात आलीयशरद पवार यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसलं. अनेक राजकीय नेत्यांनी तिचा निषेध केला असतानाच आता अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) हिने देखील तिच्या वागण्याचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

” मी जेव्हा हे वाचलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं. कारण आपण मराठी आहोत आणि मराठी कलाकाराने अशा पोस्ट करणं लज्जास्पद आहे. शरद पवार हे खूप मोठं नाव आहे, देशातच नाही तर देशाबाहेर देखील त्यांचं नाव आहे. त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल बोलणं योग्य नाही. असं बोलताना एकदा नाही तर दोनदा विचार करण्याची गरज आहे. वडीलधाऱ्या व्यक्तीबद्दल देखील बोलू नये. त्यामुळे आशा पोस्ट करणाऱ्यांवर कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, ” असं मानसी नाईकने म्हटलं आहे. (Manasi Naik on Ketki Chitale)

 

‘तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक. तिने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिलं आहे. नितीन भावे व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट असल्याचं देखील तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Web Title :- Manasi Naik on Ketki Chitale | marathi actress manasi naik ketki comment on ketki chitale controversy

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा