पोलीसनामा ऑनलाईन टीम – Manasi Naik-Pardeep Kharera | सध्या मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मानसी नाईक खूपच चर्चेत आहे. अनेक दिवसांपासून मानसी नाईक व प्रदीप खरेरा एकमेकांपासून घटस्फोट (Divorce) घेत वेगळे होणार या चर्चा चालू असतानाच मानसीने या चर्चांना पूर्णविराम देत घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती दिली होती. प्रदीप खरेरा हा बॉक्सर व मॉडल आहे. मानसीने प्रदीपशी 19 जानेवारी 2021 रोजी लग्न केले. त्यांचा सुखाचा संसार चालू असताना अचानकच दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आणि एकमेकांचे फोटो देखील डिलीट केले. त्यानंतर त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचा सर्वांना अंदाज आला. तर अखेर मानसीने याबाबत घटस्फोट घेणार असल्याचा खुलासा एका मुलाखतीत दिला. (Manasi Naik-Pardeep Kharera)
मानसीने ‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘गुलाबी नोट’, ‘बाई वाड्यावर या’ यासारख्या प्रसिद्ध गाण्यातून लोकप्रियता मिळवली होती. मानसीला एका मुलाखतीत विचारण्यात आले होते की, प्रदीप अॅथलेट असूनही तू फिटनेससाठी त्याच्याकडून मार्गदर्शन का घेत नाहीस. यावर उत्तर देत मानसी म्हणाली “यामागे देखील एक मोठे कारण आहे. जर नवरा जिम ट्रेनर असेल तर तो तुमचे लाड नक्कीच पुरवत असणार. मी वर्कआउट करताना जर 25 किलो वजन नाही उचलत असं जरी म्हटलं तरी त्यावर तो काही बोलणार नाही त्यामुळे वर्कआउट करायला प्रोत्साहन ही मिळणार नाही”. असे मानसी म्हणाले. (Manasi Naik-Pardeep Kharera)
पुढे बोलताना मानसी म्हणाली, “जर का मी 25 किलो वजन उचलत नाही
असं म्हटल्यावर तीस किलो उचलायला हवं असे त्याने हक्काने प्रोत्साहन देऊन म्हणायला हवे.
परंतु असे न करता माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी प्रदीप असे कधीच म्हणणार नाही त्यामुळे माझं वर्कआउट होणारच नाही”. असेही ती म्हणाली.
Web Title :- Manasi Naik-Pardeep Kharera | manasi naik once revealed reason why she did not do gym workout with husband pardeep kharera
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
T20 World Cup 2024 | ICC कडून टी-20 विश्वचषक 2024 च्या फॉरमॅटमध्ये मोठा बदल; जाणून घ्या