Mandakini Khadse | भोसरी भूखंड प्रकरणात मंदाकिनी एकनाथ खडसेंना दिलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांना पुण्यातील भोसरी एमआयडीसी भूखंड प्रकरणात (Bhosari MIDC plot case) मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) दिलासा दिला आहे. या प्रकरणात मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) यांची कोठडी ईडीने (ED) मागितली होती. अखेर न्यायालयाने मत स्पष्ट केलं आहे. यात ईडीला चौकशी करायची असल्यास 24 तासांपूर्वी कल्पना देण्याचे आदेश न्यायलयाने दिले आहे. याशिवाय अटकपूर्व जामिनावर (pre-arrest bail) 21 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

 

तसेच दर शुक्रवारी ईडी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने मागे घेतले आहेत. त्यानुसार पुढील सुनावणी 21 डिसेंबर रोजी होणार असून तोपर्यंत अटकेपासून देखील मंदाकिनी खडसे यांना दिलासा देण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी (Girish Chaudhary) यांच्या जामीन अर्जावरही आज न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं.

 

 

ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) ही चौकशी सुरु केली होती.
एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना त्यांच्या जावयाविरोधात भूखंड प्रकरणात काही पुरावे हाती लागले होते.
आणखी एका प्रकरणात खडसेंच्या पत्नी मंदाकिनी (Mandakini Khadse) यांचाही सहभाग असल्याचं समोर आलं होतं.
यावर मुंबई उच्च न्यायालयाने पत्नी मंदाकिनी यांना दिलेले अंतरिम संरक्षण 21 डिसेंबर पर्यंत वाढवले आहे.
मंदाकिनी यांचा ताबा द्यावा अशी मागणी होत असतानाच त्यांचा
अटकपूर्व जामीन अर्जावर 21 डिसेंबरला पुढील सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.

 

Web Title :- Mandakini Khadse | Mumbai high court gives relief to mandakini khadse and eknath khadse in bhosari midc land probe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा