अभिनेत्री मंदाना करीमीने चित्रपट निर्मात्यावर केला शोषणाचा आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री मंदाना करीमी सध्या आपला आगामी चित्रपट कोका कोलावरून चर्चेत आहे. याच दरम्यान तिने चित्रपटाचे निर्माते महेंद्र धारीवाल यांच्यावर शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. अभिनेत्रीने म्हटले की, शुटिंगच्या शेवटच्या दिवशी निर्मात्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन केले होते. मंदानाच्या या आरोपांवर प्रोड्यूसरने सुद्धा उत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की अभिनेत्रीने केलेले आरोप खोटे आहेत, उलट तिचे वागणे अनप्रोफेशनल होते.

https://www.instagram.com/p/CHuAP6JplkP/?utm_source=ig_web_copy_link

बॉम्बे टाइम्सशी बोलताना मंदानाने या घटनेवर सविस्तर चर्चा केली. तिने दिवाळीच्या एक दिवस अगोदर 13 नोव्हेंबरला झालेल्या या घटनेबाबत सांगितले. मंदानाने म्हटले, जे झाले आणि जसे झाले त्यामुळे मी अजूनही शॉक्ड आहे. कोका कोला तो चित्रपट आहे ज्यावर आम्ही जवळपास एक वर्षापासून काम करत आहोत आणि हे एक असे काम होते जेथे तुम्हाला माहित आहे की टीम प्रोफेशनल नाही, तरीसुद्धा तुम्ही काम करत आहात. सुरूवातीपासून मला या क्रू सोबत काम करण्यास अडचण होती. प्रोड्यूसर महेंद्र धारीवाल जुन्या विचारांची व्यक्ती आहेत, जे सेटला पुरूष केंद्रित आणि अहंकारग्रस्त ठिकाण बनवतात.

मंदानाने सांगितले की, शूटच्या शेवटचे दोन दिवस मी वेळेच्या अगोदर सेटवर पोहचत होते. याच दरम्यान प्रोड्यूसरने मला एक तास आणखी थांबण्यास सांगितले, ज्यावर मी नकार दिला. यानंतर प्रोड्यूसरने म्हटले की, तिने आपले शेवटचे टेक्स्ट पूर्ण करून वॅनिटीमध्ये जावे. जेव्हा ती वॅनिटी व्हॅनमध्ये गेली तेव्हा प्रोड्यूसर जबरदस्तीने अभिनेत्रीच्या व्हॅनमध्ये आला आणि तिच्यावर ओरडू लागला. नशिबाने तिथे एक स्टायलिस्ट उपस्थित होता, ज्याने प्रोड्यूसरला बाहेर काढले.

प्रोड्यूसरने अभिनेत्रीला म्हटले – ब्लॅकमेल करतेस
मंदानाने प्रोड्यूसरला काय म्हटले तेसुद्धा सांगितले. मंदानानुसार प्रोड्यूसरने म्हटले, तू जाऊ शकत नाहीस. मी तूला एक तास जादा काम करण्यास सांगितले आहे आणि तूला ऐकावे लागेल कारण मी निर्माता आहे. मी याच्यासाठी तुला पैसे दिले आहेत. यानंतर प्रोड्यूसरने तिथे आपल्या मुलासह मिळून गोंधळ घातला. प्रोड्यूसरने म्हटले – आम्ही पैसे दिले आहेत, पण तुला काम करायचे नाही, पैसेही पूर्ण पाहिजेत, ब्लॅकमेल करतेस.

प्रोड्यूसरने दिले अभिनेत्रीला उत्तर
मंदानाच्या या आरोपावर प्रोड्यूसर महेंद्र धारीवाल यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. प्रोड्यूसरने म्हटले की, त्यांनी प्रोजेक्टसाठी लॉकडाऊनच्या अगोदर मंदानासोबत 7 लाख रूपयांची डील साईन केली. काही सीन्ससुद्धा शूट केले, पण लॉकडाऊननंतर जेव्हा शुटिंग पुन्हा सुरू झाली तेव्हा मंदानाने नखरे दाखवण्यास सुरूवात केली. तिने दिल्लीत एक दिवस शुटिंगसाठी थांबण्यासाठी आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली.

प्रोड्यूसरने 13 नोव्हेंबरच्या घटनेचा उल्लेख करत म्हटले की, मंदानाची शिफ्ट सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत होती, पण तिला सायंकाळी 7 वाजता जायचे होते. यानंतर त्यांनी अभिनेत्रीला एक तास आणखी थांबण्याची विनंती केली, ज्यावर अभिनेत्री हो म्हणाली.

प्रोड्यूसरचे म्हणणे आहे की, या दिड वर्षाच्या प्रोजेक्टसाठी मंदाना करीमीने 7 लाख ऐवजी 17 लाख रुपये घेतले आहेत. त्यांनी अभिनेत्रीवर आरोप करताना म्हटले की, मंदानाचा व्यवहार खुपच अनप्रोफेशल होता. इथपर्यंत की, जेव्हा प्रोड्यूसर आपले म्हणणे समजावण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा मंदानाने त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले.