‘कोरोना’ची लागण झाल्याच्या बातम्यांवर मंदाना करीमीनं सोडलं ‘मौन’ ! म्हणाली… (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनानं जगभरासह देशात थैमान घातलं आहे. कोरोनामुळं 170 लोकांनी जीव गमावला आणि बुधवारी (दि 27 मे) मृतांचा आकडा हा 4337 झाला आहे. बाधितांचा आकडा हा 1,51,767 इतकी झाली आहे. ही आकडेवारी मंगळवारी सकाळी ते बुधवारी सकाळपर्यंतची आहे. अनेक सेलिब्रिटीदेखील याच्या विळख्यात सापडले आहे. अशातच अशी माहिती समोर आली होती की, बिग बॉसची एक्स स्पर्धक मंदाना करीमी कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे.

खुद्द मंदानानं समोर येऊन याचं खंडन केलं आहे. मंदानानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिला कोरोन झालेला नाही असं तिनं स्पष्ट केलं आहे. मंदाना म्हणाली, “माझ्या लाईव्ह येण्याचं हे कारण आहे की, तुमच्यापैकी काही लोकांनी माझ्यासाठी चिंता व्यक्त केली. अनेकांनी मला विचारलं की, तुला कोरोना झाला आहे का. तुमचे एवढी चिंता करण्यासाठी धन्यवाद. मला कोरोना झालेला नाही. मला केवळ आय इन्फेक्शन झालं आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली मी त्याची काळजी घेत आहे.”

https://www.instagram.com/tv/CApA89fJKAS/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

मंदानानं सांगितलं की, घरात काम करताना चुकून डोळ्याल हात लागला आणि केमिकलच्या संपर्कात आल्यानं हे इन्फेक्शन झालं आहे. त्यामुळं तुम्हीही घरात काम करत असताना काळजी घ्या. असा सल्लाही तिनं दिला आहे.

मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉसव्यतिरीक्त मंदाना क्या कूल है हम, मेन, चार्ल्स, भाग जॉनी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे.