‘पोल डान्स’ शिकताना ‘असा’ झाला होता मंदाना करीमीचा अपघात ! सांगितला अनुभव

पोलीसनामा ऑनलाईन टीम : टीव्ही रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस 9 ची स्पर्धक आणि मॉडेल मंदाना करीमी आपल्या बोल्डनेसमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. मंदानाचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वीच मंदानाचा सेमी न्यूड फोटो समोर आला जो सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसला. मंदांनानं आता तिचा अनुभव सांगितला आहे जेव्हा द कसीनो या वेब सीरिजसाठी पोल डान्स शिकत होती आणि तिला दुखापत झाली होती.

View this post on Instagram

🖤🤍 #quarantine #love

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

आपला अनुभव सांगताना मंदना म्हणाली, “पोल डान्सच्या सीनसाठी मी 2 दिवस प्रॅक्टीस केली. हे तर स्पष्ट आहे की, प्रोफेशनल्स जसं करतात तसं मला जमलं नाही. परंतु मी माझं उत्कृष्ट दिलं. प्रॅक्टीस करताना माझ्या पूर्ण शरीराला दुखापत झाली होती. शुटींग करताना हे सगळे घाव मेकअपच्या मदतीनं लपवण्यात आले होते. कारण काहीही करून मला ते परफॉर्म करायचंच होतं. मला वाटतं की, हे सगळं खूप चांगल्या पद्धतीनं झालं.

द कसीनो ही वेब सीरिज झी 5 वर रिलीज होणार आहे. यात नेपाळमधील कॅसीनोमध्ये सुरू असणारं कौटुंबिक भांडण यात दाखवण्यात आलं आहे. 12 जून 2020 रोजी ही सीरिज रिलीज होणार आहे. यात करणवीर बोहरा, सुधांशु पांडे, मंदना करीमी, ऐन्द्रिता रे, धनवीर सिंह, असे अनेक कलाकार आहेत. हार्दिक गज्जरनं याचं डायरेक्शन केलं आहे.

मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉस 9 व्यतिरीक्त मंदाना क्या कूल है हम, मेन, चार्ल्स, भाग जॉनी यांसारख्या अनेक सिनेमात दिसली आहे. लवकरच(12 जून 2020) ती आता द कसीनो या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.

View this post on Instagram

On my mind ☀️ 💛

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

View this post on Instagram

On to bigger and better #2020 🖤

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

View this post on Instagram

🌈🌊👙 #goa2020

A post shared by Mandanakarimi (@mandanakarimi) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like