फायद्याची गोष्ट ! ‘या’ अटीवर ‘फ्री’ मिळणार FASTag अन् महामार्गावर गाडी चालवणं, NHAI ची घोषणा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर फास्ट टॅग 15 जानेवारीपासून अनिवार्य केले आहे. सध्या 50 टक्के वाहन चालक फास्ट टॅगचा वापर करत आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (NHAI) फास्ट टॅग संबंधित माहिती देताना सांगितले की जर टोल नाक्यावर फास्ट टॅग रिड झाला नाही तर प्रवाशांना फ्री प्रवास करायची संधी भेटेल.

अधिसूचनेनुसार टोल नाक्यावर फास्टॅग मशीन फास्ट टॅग योग्यरित्या स्कॅन करु शकली नाही तर वाहनाला टोल फ्री प्रवासाची परवानगी मिळेल. फास्ट टॅगची एक प्रीपेड रिचार्जेबल टॅग सेवा आहे, जी हायवेवर स्वयंचलित टोल जमा करुन घेईल. यामुळे फक्त वेळीची बचतच होणार नाही तर हे देखील सुनिश्चित होईल की कोणते वाहन तेथून गेले आणि किती रक्कम जमा झाली.

सिस्टम लागू करण्याचे कारण लोकांची टोल नाक्यावरील रांगेतून मुक्ती करणे. कारण टोल प्लाजा कॅशलेस नसल्याने लोकांना टोल भरेपर्यंत आणि पावती घेईपर्यंत टोल नाक्यावर थांबावे लागत होते. ज्यातून आता त्यांची मुक्ती होईल.

असे होईल रिचार्ज आणि कापला जाईल टोल
फास्ट टॅग स्टीकर लावल्याने तुम्हाला आयडी मिळेल. जे तुमच्या अकाऊंटला लिंक असेल. त्या अकाऊंटमध्ये किमान 10 रुपये बॅलन्स असणे आवश्यक आहे. जर तुम्ही बँक खात्यात पैसे ठेवले नाहीत तर तुमचे खाते ब्लॅकलिस्टमध्ये जाईल. जर तुम्ही 500 रुपये रिचार्ज केले असेल आणि तुमचे फास्ट टॅग अकाऊंटमधून पैसे संपले तर तुम्ही ते टोल नाक्यावरुन पुन्हा रिचार्ज करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा –

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like