वर्गणीसाठी मंडळाची नोंदणी बंधनकारक धर्मादाय आयुक्‍तालयाचे गणेश मंडळांना आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. प्रत्येकजण गणरायाच्या स्वागताच्या तयारीला लागला आहे. ज्या प्रमाणे घरामध्ये गणरायाचे स्वागत केले जाते तसेच सार्वजनीक गणेश मंडळांकडूनही गणरायाचे स्वागत केले जाते. गणेश मंडळांकडून गणरायाच्या स्वागतासाठी आणि दहा दिवसांच्या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा केली जाते. मात्र, मंडळाला वर्गणी गोळा करायची असेल तर अगोदर धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून ऑनलाइन पद्धत्त सुरू करण्यात आली असून, गणेश मंडळांना २७ ऑगस्टपासून नोंदणी करता येणार आहे. त्यानंतर आयुक्तालयाची वर्गणीसाठी परवानगी दिली जाणार आहे.
[amazon_link asins=’B075724BVF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’385a237e-a3a6-11e8-aad6-c76b2bf42196′]

13 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या गणेशोत्सवासाठी निधी गोळा करण्यास मंडळांकडून सुरूवात होईल. निधी गोळा करण्यासाठी गणेश मंडळांनी 27 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाइन परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी या दरम्यान मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्‍यक आहे. नोंदणीसाठी धर्मादाय कार्यालयाच्या www.charity.maharastra.ov.in या वेबसाईटवरून नोंदणी करावी, असे आवाहन धर्मादाय उपायुक्तांनी केले आहे. ऑनलाइन परवानगी देण्याची पद्धत मागील वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B075YP6Y69′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4254eb10-a3a6-11e8-9e80-9dc153056383′]

निधी गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त अधिनियम 1950 च्या कलम 41 क अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात परवानगी देण्यात येते. नोंदणी करताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येतो. उत्सव परवानगीसाठी मागील वर्षाचा लेखा परीक्षण अहवाल, परवाना पत्र, प्रथम वर्ष असल्यास नगरसेवकांचे शिफारस पत्रही आवश्‍यक असणार आहे. त्याशिवाय सर्व सदस्यांचे ओळखपत्र, जागा मालकाचे ना हरकत आदी कागदपत्रांची आवश्‍यकता आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अन्वये धर्मादाय कार्यालयात नोंदणी झालेल्या न्यासांना किंवा मंडळांना नोंदणी करण्याची आवश्‍यकता नाही, असेही जगताप यांनी स्पष्ट केले.