मंदिर वही बनायेंगे… तारीख कब बतायेंगे ? : श्रीराम मंदिर निर्माण न्यास अध्यक्ष

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजय शरणजी महाराज यांनी मातोश्री येथे ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. याचबरोबर अयोध्येला येण्याचे निमंत्रणही दिले आहे.

अयोध्या शिवसेनेचा गड आहे, ‘शिवसेनेच्या ताकदी आणि मदतीशिवाय राममंदिरचे निर्माण होऊ शकत नाही, यामुळे आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. असे श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3acd9c03-c7a3-11e8-a0e9-0707c452d6a6′]

यादरम्यान श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांचे आमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. राममंदिर निर्मितीसाठी उद्धव ठाकरे हे जातीने अयोध्येला जाणार आहेत. इतकेच नव्हे तर यांच्या हस्ते राम मंदिराची वीट रचली जाणार आहे. दसऱ्यानंतर ते अयोध्येला कूच करणार असून त्याची तारीख शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात घोषित केली जाणार आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत अयोध्येला जाण्याची तसेच वाराणसीला गंगा आरती करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती, तसेच मुंबईत ‘चलो अयोध्या, चलो वाराणासी’ आणि ‘सौ सोनार की एक लोहार की’ अशा घोषणा असलेली पोस्टर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने झळकली होती.

[amazon_link asins=’B00FRCNR6U,B077S3Y5MQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’70d6ec6c-c7a3-11e8-8581-df080618de3d’]

निवडणुकींच्या ऐन तोंडावरच अयोध्या राम मंदिराच्या संदर्भात श्रीराम मंदिर न्यासाचे अध्यक्ष जन्मेजयशरणजी महाराज यांनी शिवसेना पक्षप्रमुखांची भेट का घेतली असेल, हा एखादा राजकीय डाव आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि भाजपा मध्ये राममंदिर प्रश्नावरून चांगलीच चढाओढ निर्माण होणार असल्याचे चिन्हही दिसत आहेत.

आता लवकरच लोकसभा निवडणूक होणार आहेत. यावेळी युती ठेवायची का नाही , भाजपाला मदत करायची की अडचणीत आणायचे. याचदरम्यान आयतीच संधी शिवसेनेकडे चालून आल्याचे दिसून येत आहे.

आता शिवसेना या संधीचा उपयोग कसा करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याचबरोबर राम मंदिर निर्माण होणार का ? असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

[amazon_link asins=’B00LHZWD0C,B00LZLPYHW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8b2f4ed9-c7a3-11e8-916e-632ec91fddbf’]