कौतुकास्पद ! अभिनेत्री मंदिरा बेदीने दत्तक घेतली 4 वर्षाची मुलगी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनयासोबतच फिटनेसमुळेही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचा पती राज कौशल (mandira-bedi-and-raj-kaushal-adopts-4-year-baby-girl) यांनी एक 4 वर्षांची मुलगी दत्तक आहे. सोशल मीडियावर मुलीसोबत आपल्या परिवाराचा फोटो मंदिराने शेअर (shares-picture-her-social-media) करत याची फॅन्सना याची माहिती दिली आहे. मंदिराने हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच सेलिब्रिटींसोबतच फॅन्सही मंदिराला शुभेच्छा देत आहेत.या कामामुळे तीची प्रशंसा होत आहे.

या जोडीने 28 जुलै 2020 ला या मुलीला दत्तक घेतले होते. गेल्या काही महिन्यांपासून मंदिरा बेदी आणि राज कौशल मुलीला दत्तक घेण्याची प्रक्रिया करत होते. ती आता पूर्ण झाली आहे. या मुलीचे नाव तारा (tara) असे आहे. मंदिरा आणि राज यांना आधीच एक 9 वर्षांचा मुलगा आहे.

मंदिराने फोटोसोबत पोस्टमध्ये म्हटले आहे की, आमची लहान मुलगी तारा आमच्याकडे देवाच्या आशीर्वादासारखी आली आहे. 4 वर्षाची मुलगी जिचे डोळे ताऱ्यासारखे चमकतात. वीरने त्याच्या बहिणीचं प्रेमाने स्वागत केलं. तारा बेदी – कौशल 28 जुलै 2020 ला आमच्या परिवाराची सदस्य झाली असल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान मंदिराने शांति मालिकेतून डेब्यू केलं होतं. त्यानंतर ती शाहरूख खानसोबत दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे मध्ये दिसली होती. मंदिरा शेवटची साहो सिनेमातही दिसली होती.

You might also like