ताज्या बातम्याराष्ट्रीय

Video | मंदिरा बेदीने दिला पती राज कौशल यांच्या पार्थिवाला खांदा, इमोशनल करणारी छायाचित्रे वायरल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मंदिरा बेदी (Mandira Bedi) साठी बुधवारचा दिवस एखाद्या वाईट स्वप्नासारखा होता. तिने आपले प्रेम आज कायमसाठी गमावले. बुधवारी सकाळी मंदिरा बेदीच्या पतीने अखेरचा श्वास घेतला. मंदिरा बेदी (Mandira Bedi)  आणि तिच्या दोन्ही मुलांसाठी हा दु:खाचा काळ आहे, ज्यातून सावरणे कुटुंबासाठी अवघड आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

मंदिरा बेदीचा पती राज कौशल यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत. राज कौशल यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक सेलेब्स सुद्धा पोहचले होते. राज यांना अंत्यसंस्कारासाठी घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये मंदिरा बेदी पतीच्या पार्थिवावाला खांदा देताना दिसत आहे. यावेळी मंदिरा बेदी स्वताला आवरू शकले नाही.

File photo

तिची अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये दु:ख अनावर झाल्याने ती रडताना दिसत आहे. ज्यावेळी राज कौशल यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी नेले जात होते, तेव्हा अ‍ॅम्ब्सुलन्सच्या आत बसलेली मंदिरा विलाप करताना दिसत होती.

File photo

25 वर्षांची सोबत तुटल्यानंतर झालेले दुख मंदिराला अनावर झालेले दिसत होते. राज कौशलच्या अंत्ययात्रेत रोनित रॉय, अपूर्व अग्निहोत्री सारखे कलाकार दिसले. रोनित आणि राज कौशल जवळचे मित्र होते.

File photo

राज कौशल प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक होते. राज यांनी अनेक अ‍ॅड बनवल्या होत्या. अवघ्या 49 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने कुटुंबिय हवालदिल झाले आहे.

File photo

 

राज आणि मंदिरा यांना दोन मुले आहेत. मागच्या वर्षी आपले कुटुंब पूर्ण करण्यासाठी त्यांनी 4 वर्षांची मुलगी दत्तक घेतली होती. परंतु आवघ्या 1 वर्षात या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

File photo

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : mandira bedi breaks down at husband raj kaushal last rites heartbreaking video

File photo

हे देखील वाचा

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट !
आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू

8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच पोलीस ‘युनिट’मध्ये कार्यरत असणाऱ्या PSI, API,
पोलीस निरीक्षकाची इतर ठिकाणी होणार बदली

Form 16 काय आहे आणि तो कुठे उपयोगी पडतो, जाणून घ्या याच्याशी संबंधीत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

 

File photo

 

Back to top button