मंदिरा बेदीच्या अलिशान घरामध्ये घालवायचाय एक दिवस, अशी मिळणार संधी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री मंदीरा बेदी तिच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान आता ती सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खानच्या पावलावर पाऊल ठेवताना पाहायला मिळत आहे. नुकताच शाहरुख आणि गौरीने आपले घर Airbnb या रेंटल अ‍ॅपवर लिस्ट केले होते आणि आता मंदीरा बेदीने देखील ऑनलाईन ट्रॅव्हल ब्रॅण्डसोबत हाथ मिळविला आहे. मंदिराने मड आयलँडवाले आपले आलिशान घर Airbnb वर लिस्ट केले आहे.

माहितीनुसार, मंदिराच्या या आलिशान घरात चार बेडरूम, आणि पाच बाथरूम आहे. ज्यात एक मोठा स्विमिंग पूलही आहे. या घरातील प्रत्येक गोष्टीला हॉलिडे सेलीब्रेट करण्यासाठी अगदी काळजीपूर्वक बनविले गेले आहे. नुकताच या घराचे रिन्यूवेशन करण्यात आले आहे, जे समुद्राच्या किनार आहे. आता मंदिराच्या या सुंदर घराला व्हेकेशनसाठी आपण रेंटवर घेऊ शकता. आपल्याला मंदिराच्या या घरात राहण्यासाठी एका रात्रीचे जवळपास 42 हजार रुपये द्यावे लागतील.

मंदिरा बेदीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या या घराचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती रेड कलरचा सुंदर आऊटफिट घातलेली पाहायला मिळत आहे. काही इतर फॅन पेजवरही मंदिराच्या घराचे फोटो शेअर झाले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री घराच्या आलिशान लॉबी आणि स्विमिंग पुलसोबतच इतर ठिकाणी पाहायला मिळत आहे.

दरम्यान एका इव्हेंटमध्ये महिला दिनानिमित्त मंदिरा म्हणाली की, ‘मी त्या महिलांविषयी ऐकून हैराण आहे, ज्या खूप परिश्रम करतात, नियमांना आव्हान देतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून एक यशस्वी उद्योजक म्हणून स्वतःला सिद्ध करतात.