मंदिरा बेदीने केले हॉट ‘फोटो’ शेअर, वेगळीच चर्चा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री परदेशात फिरायला जाऊन इंस्टाग्रामवर आपले वेगवेगळे फोटो चाहत्याबरोबर शेअर करत असतात. असाच फोटो मंदिरा बेदीने इस्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या मंदिरा बेदी मालदीवमध्ये सुट्यांच्या आनंद लुटत आहे. या दरम्यान तिने मालदीवमध्ये काढलेले तिचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. तीने आपले बिकनीमधील फोटो सोशल मिडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांच्या लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते तर घायाळच झाले.

तिने शेअर केलेल्या या फोटोत ती अत्यंत हॉट दिसत आहे. सध्या तिच्या ग्लॅमरची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या बिकनीमध्ये आहे. तीच्या या अफलातून लुक मूळे चाहते तर घायाळच झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंटचा पाऊस पाडला असला तरी, अभिनेत्री मौनी रॉयने देखील तिच्या या जबरदस्त हॉट अंदाजावर हॉट अशी कमेंट केली आहे. तीचा हा बोल्ड अंदाजातील फोटो सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

मंदिरा सध्या ४७ वर्षाची आहे. तीने राज कौशल बरोबर लग्न केले, त्यांना एक ८ वर्षांचा मुलगा आहे. आता मंदिराने त्यांच्या सुट्टीचे आनंद घेत असलेले तिचे बोल्ड फोटो शेअर केले असले तरी ती कायमच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते, ती कायम तीच्या इंस्टाग्रामला तिचे जिममधील वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ शेअर करत असते. आगामी चित्रपट ‘साहो’ मध्ये सध्या मंदिरा व्यस्त आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर, प्रभास हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू या भाषेत ३० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त