‘तुम्ही काय राजे नाहीत, तुम्ही लहान-मोठे कर्मचारी’ आमच्या भीकेवर जगताय : भाजपा खासदार मेनका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील लोकसभा निवडणुकीत आपल्या बेताल वक्तव्यांमुळे दोन दिवसांचा प्रतिबंध भोगलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मनेका गांधी पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आल्या आहेत. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना सुनावताना चुकीच्या शब्दांचा वापर केला.

यावेळी बोलताना सुलतानपूरच्या खासदार असलेल्या मनेका यांनी एका अधिकाऱ्याला तुम्ही राजा असाल किंवा कर्मचारी, आमच्या भीकेवर जगताय, असं वादग्रस्त विधान केलं आहे. मनेका या सुलतानपूर दौऱ्यावर होत्या. या दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मनेका येथील विद्युत विभागाची तपासणी करत होत्या. त्यावेळी त्यानी या विभागातील कर्मचाऱ्यांवर बरसल्या. मात्र यावेळी त्याची जीभ घसरली. ”तुम्ही राजा असाल किंवा छोटे-मोठे कर्मचारी… तुम्ही आमच्याच भीकेवर जगताय.” असे म्हणत त्यांनी या कर्मचाऱ्यांचा सर्वांच्या समोर अपमान केला.

दरम्यान, मनेका गांधी यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून या व्हिडीओमुळे त्यांच्यावर विविध स्तरातून मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –